केज दि २२(प्रतिनिधी) शहरातील बाबुराव आडसकर महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा प्रशांत बब्रुवान क्षीरसागर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड...
केज दि २२(प्रतिनिधी) शहरातील बाबुराव आडसकर महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा प्रशांत बब्रुवान क्षीरसागर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कडून मराठी विषयात पीएच डी प्रदान करण्यात आली.त्यांनी
जागतिकीकरणाचा मराठी भाषेवर प्रभाव:एक चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन कार्य केले. मार्गदर्शक प्राचार्य डॉ आशा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली
संशोधन कार्य पूर्ण केले.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर ,प्राचार्य डॉ माधवराव फावडे,
प्रा डॉ सोळंके,डॉ माने ,प्रा डॉ आशा बोबडे,डॉ श्याम सरसरे,प्रा डॉ भंडे, आदींसह प्राध्यापक, कर्मचारी वृंद,यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS