केज प्रतिनिधी
सामान्य जनतेची कामाच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूक शासन करते, त्या मोबदल्यात त्यांना तसा पगार ही दिला जातो परंतु काही अधिकारी या पदांचा गैर वापर करतात असाच पदाचा गैर वापर केज येथील एका तलाठ्याने केला आहे.
संपादित जमिनीचे क्षेत्र कमी दाखवण्यासाठी १ लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्यासह सहाय्यकाला ‛एसीबी’च्या पथकाने येथील तहसीलच्या आवारातील टाकळी सज्जाच्या कार्यालयाजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पकडले .
या तलाठी महाशयाचे नाव दयानंद शेटे तर सचिन घुले असे पकडलेल्या सहाय्यकाचे नाव आहे.
या तलाठ्याने तक्रारदाराकडून पाझर तलावात संपादित जमिनीसंबधीत क्षेत्र कमी दाखविण्यासाठी १ लाख रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सहाय्यकाकडून ५० हजार रुपये स्वीकारताना ‛एसीबी’च्या पथकाने चतुर्भुज केले. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

COMMENTS