नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
गोदावरी मनार सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा साई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव पाटील खतगावकर ( वय ८५ ) यांच्यावर बुधवारी दि.६ जानेवारी रोजी खतगाव ता. बिलोली) येथे पावणे पाच वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मागील काही दिवसा पासून हैदराबाद येथील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालवली. ये माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे जेष्ठ बंधू होत.
हरियाणा राज्यातील कांगडी येथे गुरुकुलात त्यांचे शालेय शिक्षण झाले होते. त्यामुळे त्यांचा संस्कृत व हिंदी भाषेवर पगडा होता. त्यांचे पदवी व पदवीत्तर शिक्षण पुणे येथे झाले होते. त्यांना या वयातही भग्वतगीता मुखोद्गत होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्राम गीतेचे हिंदी भाषेत भाषांतर केले आहे. त्याच बरोबर मधुकंज, ओवी गावू विज्ञानाची, भग्वतगितेचा हिंदी पद्य अनुवाद इत्यादी साहित्य निर्मिती केली आहे.
राजकीय,सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्त्व असलेले तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती, गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना शंकरनगर चे माजी चेअरमन, नरसिंह सहकारी सूत गिरणी खानापूर चे माजी चेअरमन,गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर चे उपाध्यक्ष तथा माजी सचिव,श्री साई शिक्षन प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड चे सदस्य आदी विविध पदावर त्यांनी काम केले आहे.
यावेळी बापूसाहेब देशमुख गोरठेकर,माजी आमदार शिवाजी पाटील तळेकर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर,माजी खासदार माधवराव पाटील किन्हाळकर,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार सुभाष साबणे, मधुबन महाराज कोलंबीकर, अभिनेते अनिल मोरे, केशवराव चव्हाण, अनंत चव्हाण, माधवराव पाटील शेळगावकर, श्रीनिवास चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, प्रवीण पाटील चिखलीकर, विजय चव्हाण, संजय बेळगे,श्रावण भिलवंडे,हणमंतराव चव्हाण, अशोक पाटील राजूरकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, दिलीप पाटील बेटमोगरेकर, संजय पाटील शेळगावकर, रघुनाथ पाटील राजूरकर,नंदू पाटील पळणीटकर, गणेश पाटील करखेलीकर,सुरजितसिंग गील, प्रकाश पाटील बडूकरकर,यादवराव तुडमे, श्रीधर चव्हाण, रावसाहेब पाटील हळदेकर, भास्कर भिलवंडे, संग्राम हयगले, संभाजी भिलवंडे,बालाजी बच्चेवार यांच्यासह असंख्य नागरिक अंत्यविधीत सहभागी झाले होते.

COMMENTS