आणि त्या कर्तबगार कर्मचाऱ्याचे आयजींकडून कौतुक जिवाची पर्वा न करता नऊ बालकांचे वाचविले होते प्राण


जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली

नांदेड परिक्षत्राचे कर्तव्यदक्ष विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी हे ठाणे वार्षिक तपासणी साठी हिंगोली दौऱ्यावर आहेत. यावेळी तांबोळी हे जिल्ह्यातील विविध ठाण्याला भेटी देत असुन ठाण्यांची वार्षिक तपासणी बरोबर पोलिस कर्मचाऱ्यांना संवाद साधत आहेत. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात भेटी दरम्यान आयजी तांबोळी यांचे लक्ष समोर उभ्या असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या वर्दीवर असलेल्या पदकाकडे गेले आणि लगेच आयजी तांबोळी यांनी कर्मचाऱ्याला विचारणा केली असता परभणी येथे कर्तव्यावर असतांना नऊ बालकांचे ट्रकला लागलेल्या भिषण आगीतुन प्राण वाचविल्याचे सदर पोलिस कर्मचाऱ्यांने सांगताच जुन्या आठवनींना उजाळा देत आयजी तांबोळी साहेबांनी परभणी नानलपेठ परिसरातील घटना का? गुड-गुड म्हणत त्या कर्मचाऱ्याचे कौतुक केले.


 

सपोउपनी दादाराव डूकरे हे 14 एप्रील 1989 साली परभणी पोलिस दलात कर्तव्यावर असतांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या दिवशी परभणी शहरातील गौतम नगर येथून काढलेली मिरवणूक हि नानलपेठ पोलिस ठाण्याच्या परिसरात आल्या नंतर ट्रकचा डिझेलटँक फुटून स्फोट होऊन ट्रकला आग लागली होती. यावेळी ट्रक मध्ये 79 मुले बसलेली होती. काही क्षणातच ट्रकच्या चारही टायरने पेट घेतला होता. यावेळी ट्रकमध्ये 9 बालके अडकली होती. घटनास्थळी कर्तव्यावर असलेले पोलिस शिपाई दादाराव डूकरे यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जळत्या ट्रकमध्ये चढून त्या नऊ बालकांचे प्राण वाचविले होते. यावेळी डूकरे यांचा हाथ आगीत गंभिर भाजला होता.डूकरे यांच्या निष्ठा व धेर्याने महाराष्ट्र पोलिस दलाची शान वाढली होती ज्याची दखल घेऊन मा.पंतप्रधान यांचे *जिवन रक्षा पदक* व पाच हजार रूपये रिवार्ड देऊन दादाराव डूकरे यांच्या कामगिरी चा तत्कालीन पोलिस महांचालक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. दादाराव डूकरे हे सध्या हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. वार्षिक तपासणी दरम्यान नांदेड चे कर्तव्यदक्ष आयजी यांचे लक्ष डूकरे यांच्या वर्दीवरील पदकाकडे गेल्याने हिंगोली पोलिस दलातसुध्दा असे कर्तबगार पोलिस कर्मचारी असल्याची बाब समोर आली असून अशा कर्तबगार कर्मचाऱ्याला गलोबल मराठवाडा न्युज चा सलाम.

टिप्पण्या