प्रतिनिधी/माजलगांव
प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष राज्याचे राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांच्या विचार प्रेरित करून बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष विलास भाऊ साळुंके यांच्या नेतृत्वाखाली तसेच मुख्य मार्गदर्शक माजलगाव तालुका अध्यक्ष गोपाळ भाऊ पैंजणे , यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव युवक तालुकाध्यक्ष संभाजी इदगे पाटील यांनी प्रहार जनशक्ती पक्षांमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे . युवक तालुकाध्यक्ष संभाजी इदगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे एक वाक्य सांगितले. लक्षात आलं की गोरगरीब यांनासुद्धा बच्चुभाऊ बद्दल आस्था, प्रेम कामाचं निस्वार्थ पणे पाहून कसं वाटत की हे गोरगरीब शेतकरी, दीव्यांग, कामगार, यांना शुद्दा कुणीतरी वाली आहे. गोरगरीब शेतकरी, डिव्यांग, कामगार यांच्या मागण्या आमच्या अडचणी शासनाच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम हे बच्चुभाऊ कडू करू शकतील. म्हणून सर्व शेतकरी गोरगरीब, दिव्यांगी यांनी बच्चु भाऊ यांचे हात बळकट करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षांमध्ये सामील होणे गरजेचे आहे, असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुकाध्यक्ष संभाजी इदगे पाटील यांनी केले आहे.

COMMENTS