नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
पद्मशाली समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन येथील मार्कण्डेय मंदिरात दि.6 जानेवारी 2021 रोजी करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय चरपीरवार यांची उपस्थिती होती.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचारऱ्यांचे विविध प्रश्न शासकीय पातळीवर पाठपुरावा करुन मार्गी लावण्याबरोबरच समाजातील यशवंत व गुणवंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी जिल्हास्तरावर गुणगौरव सोहळा आयोजित करतात. तसेच दरवर्षी दहा हजार दिनदर्शिका काढून त्या मोफत वितरीत करण्यात येतात. यंदाही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागभुषण दुर्गम यांनी पुढाकार घेवून अतिशय दर्जेदार दिनदर्शिका काढली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन येथील मार्कण्डेय मंदिरात बुधवारी करण्यात आले. यावेळी पद्मशाली समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय चरपीलवार, पद्मशाली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश ताटेवार, पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार, समाजाचे जेष्ठ नागरिक विठ्ठलराव गुरुपवार, किशनराव कोकूलवार, तुळशीराम बिरेवार, व्यंकटराव चन्नावार, देविदास मोरेवार, साईनाथ आलेवार,नागेश पुट्टा. पिराजी चन्नावार, शंकर रामदिनवार, दिगांबर यलगंदवार, बाळू चलमेवार, दम्मेवार अदिंची उपस्थिती होती.

COMMENTS