जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी हे वार्षीक तपासणी साठी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. अशातच आज दुपारी 3 वाजता गांधी चौकात आयजींच्या हस्ते हरवलेल्या, मिसिंग व्यक्तींचे फोटो प्रदर्शनी चे उद्घाटन होते. यावेळी अचानक एक महिला हंबरडा फोडत गांधी चौकात अली साहेब माझा पाच वर्षाचा मुलगा चिकू हरवला आहे. तो मला शोधून द्या अशी पोलिसांना गयावया करू लागली. यावेळी गांधी चौकात उपस्थित स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी सदर महिलेला नाव गाव विचारले असता महिलेने रडत रडत मी हिंगोली तालुक्यातील साटंबा येथिल रहिवासी असुन सध्या मस्तानशहा नगर येथे राहते माझा पाच वर्षाचा मुलगा साहिल उर्फ चिकू संतोष सरोदे हा माझ्या सोबत जंक्शन रेडिमेड कापड दुकानात सोबत होता पण कपडे खरेदीच्या नादात त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने तो हरवला आहे. अशी कहाणी महिलेने पोलिसांना सांगीतली यावेळी कर्तव्यावर उपस्थित स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक उदय खंडेराय यांनी दखल घेत उपनिरीक्षक घेवारे यांना महिलेला मदतीसाठी सांगितले यावेळी तात्काळ पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर महिलेला घेऊन जक्शन रेडिमेड दुकान गाठून हरवलेल्या मुलाचे सिसिटिव्ही फुटेज घेऊन मुलाचे फोटो पोलिस कर्मचारी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कर्मचारी यांच्या वाटसप ग्रुपला टाकुन सदर मुलाचा शोध घेतला असता सदर चिकू नावाचा मुलगा शहरातील गोदावरी काँर्नर येथे रडत उभा असल्याचे अढळून आले. सदर मुलाला तात्काळ मातेच्या हवाली केले असता हंबरडा फोडणारे मातेच्या चेहऱ्यावर क्षणात हसू फुलले. स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असलेले तरूण पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या कार्यतत्पर ते मुळे तात्काळ त्या मातेला तिचा चिकू परत मिळाला..
*काही महिन्यांपूर्वी वाचविले होते शेतकरी याचे प्राण*
अशाच प्रकारे काही महिन्यांपूर्वी हिंगोली सेनगाव मार्गावर सरकळी येथील शेतकरी शेषराव समोसे हे मळणीयंत्रातुन उडिदाचे पीक काढत असतांना तोल जाऊन मळणीयंत्रात पडून गंभीर जखमी झाले होते. मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेतकऱ्याला दवाखान्यात नेण्यासाठी कोणी समोर येत नव्हते यावेळी या मार्गावर कर्तव्यावर जात असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला सदर बाब निदर्शनास आल्यावर क्षणाचाही विलंब न करता स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी पथकातील पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने तात्काळ वाहणात टाकुन सदर शेतकऱ्यांला हिंगोली सरकारी दवाखान्यात पोहचून त्याचे प्राण वाचविले होते. अशा कर्तबगार पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांना ग्लोबल मराठवाडा न्युज चा सलाम


COMMENTS