माजलगावात अडीच कोटी रुपयाच्या नाट्यगृहाचे बांधकाम करणार - आ. प्रकाश सोळंके

माती आणि नाती याचं नातं जो जपतो तो जीवनात यशस्वी होतो - सिने अभिनेता संदीप पाठक - माजलगावात दर्पणदिनी पुरस्कराचा शानदार सोहळा संपन्न माजलगाव...


  • माती आणि नाती याचं नातं जो जपतो तो जीवनात यशस्वी होतो - सिने अभिनेता संदीप पाठक

  • - माजलगावात दर्पणदिनी पुरस्कराचा शानदार सोहळा संपन्न

माजलगाव/प्रतिनिधी 

       दि. ६ जानेवारी दार्पणदिनी माजलगाव पत्रकार संघाच्या आयोजित दर्पण कार्यक्रमात कोरोना योद्धे,नारी सन्मान आणि दर्पण पुरस्कारासह माजलगाव भूषण पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते शानदार वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना आ. सोळंके यांनी माजलगाव शहरात अडीच कोटी रुपयांच्या नाट्यगृहाचे बांधकाम लवकरच सुरु करणार असून दोन वर्षात हे नाट्यगृह परीपूर्ण असेल तर आपली माती आणि आपलं नातं जो जपतो तोच जीवनात यशस्वी होतो असे मी कायम मानतो असे मत सिनेअभिनेते संदीप पाठक यांनी माजलगाव शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात आयोजित दर्पण पुरस्कार कार्यक्रमात व्यक्त केले.

            या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आ.प्रकाश सोळंके, मा.आ.डी.के.देशमुख, मा.आ.मोहनराव सोळंके, रमेश आडसकर, बाबुराव पोटभरे, नगराध्यक्ष शेख मंजूर, मिलिंद आव्हाड, नितीन नाईकनवरे, सभापती संभाजी शेजुळ यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व धनंजय जाडे यांनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. यावेळी माजलगाव भूषण म्हणून सिनेअभिनेते संदीप पाठक तर दर्पण पुरस्कार जेष्ठ पत्रकार संतोष मुळी यांना देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर हे होते यावेळी कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. सुरेश साबळे, डॉ.अनिल परदेशी, डॉ.श्रेयस देशपांडे,डॉ.श्रीनिवास शिंगणे, डॉ.यशवंत राजेभोसले, डॉ.दत्तात्रय पारगावकर, डॉ. गजानन रुद्रवार, पोलिस निरीक्षक धनंजय फराटे व संतोष पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या सह न.प. कर्मचारी विलेश कांबळे,संतोष घागडे,संकेत साळवे यांचा सन्मान करण्यात आला तर सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमात आष्टी येथील मुख्याधिकारी नीता अंधारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबई येथील अमृता बोरचाटे, सौ. पंचशीला ओव्हाळ, सौ.आशा सिरसट, सौ.अंजली शिंदे व वर्षा पवार, दीपाली गीते यांचाही यावेळी गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आ. प्रकाश सोळंके म्हणाले कि, माजलगाव पत्रकार संघाने आयोजित केलेला हा दर्पण गौरवाचा कार्यक्रम एक सामाजिक बांधिलकीचे जागते उदाहरण आहे. माजलगाव पत्रकार संघातील पत्रकार सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असतात म्हणून पत्रकारांच्या प्रत्येक कर्यक्रमास मी आवर्जून उपस्थित रहातो. माजलगाव शहरात अडीच कोटी रुपये खर्च करून येत्या वर्षभरात नाट्यगृहाची निर्मिती करणार असून हे नाट्यग्रह पूर्ण करण्याचे आश्वासन देवून त्यांनी या नाट्यगृहाला कै. शाम पाठक हे नाव देणार असे जाहिर केले तर सिनेअभिनेते संदीप पाठक म्हणाले कि,मी ज्या माती मध्ये जन्मलो आणि ज्या नात्यात वाढलो त्या मातीला आणि त्या नात्याला मी कधीच विसरलो नाही माझ्या आई वडिलांची शिकवण मी कायम लक्षात ठेवली असून जिथे जिथे मी जाईल तिथे तिथे माजलगावच नाव कसे गाजेल याचा प्रथम मी विचार करील नात्याशी आणि मातीशी जो जोडलेला असतो तो जीवनात यशस्वी आणि परिपूर्ण होते असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर संदीप पाठक यांनी दिलखुलासपणे व्हराड निघालाय लंडनला यातील काही छटा सादर करून उपस्थिती मंडळींची मने जिंकली. यावेळी मिलींद आवाड, बाबुराव पोटभरे, रमेशराव आडसकर, डाॅ. श्रेयस देशपांडे, पोलिस निरीक्षक संतोष पाटील, निता अंधारे, अमृता बोरचाटे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले यांनी केले. सुत्रसंचालन व सत्कारमुर्तींच्या मानपत्रांचे वाचन उपप्राचार्य प्रा. रमेश गटकळ यांनी केले तर आभार कमलेश जाब्रस यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनकर शिंदे, महेंद्र मस्के, दत्ता येवले, अरविंद ओव्हाळ, जगदीश साखरे, दिगंबर सपकाळ, पांडुरंग कुलथे, निलेश गरूड, राज कोंबडे यांनी परिश्रम घेतले. सामुहिक राष्ट्गिताने कार्यक्रमाची सांगता झाली. 


पेन्शन आणि संरक्षण मिळावे - संतोष मुळी

पत्रकार पेन्शन आणि संरक्षण योजना या तात्काळ लागू होणे गरजेचे आहे यासह समाजात असणाऱ्या शैक्षणिक प्रश्नांवर प्रकाश टाकत आ. प्रकाश सोळंके यांनी ते प्रश्न निकाली निघण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत यावेळी दर्पण पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार संतोष मुळी यांनी व्यक्त केले.

पत्रकारांचा उपक्रम स्तुत्य - रमेश आडसकर 

समाजातील प्रश्न सातत्याने पत्रकार हे सोडवत असतात माजलगाव येथील पत्रकार संघ हा नेहमीच सामाजिक कार्यात आपले मोठे योगदान नेहमीच देत आहे हा आज आयोजित केलेला कोरोना योध्याचा सन्मान करून हा कार्यक्रम त्यांचे मनोबल आणि धेर्य वाढवणारा ठरला असून त्याचे कार्य नेहमीच स्तुत्य राहिला आहे.असे मत भाजप नेते रमेश अडसकर यांनी व्यक्त केले.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel