एकही शाळा इमारती पासून वंचित राहणार नाही --- बजरंग सोनवणे

हारगडवाडी येथे बजरंग सोनवणे यांच्या हस्ते शाळेच्या भूमिपूजन  केज प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील एकही शाळा किंवा वर्ग आता उघड्यावर भरणार नाही. ...


हारगडवाडी येथे बजरंग सोनवणे यांच्या हस्ते शाळेच्या भूमिपूजन 

केज प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील एकही शाळा किंवा वर्ग आता उघड्यावर भरणार नाही. सर्व शाळांना इमारती बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ज्ञानदानाचे कार्य करावे. लवकरच शाळा सुरू होणार आहेत. असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील हारगडवाडी येथे शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

केज तालुक्यातील हारगडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी ९ लाख रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. दि. १७ जानेवारी रोजी बजरंग सोनवणे यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोराळे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय उर्फ पिंटू ठोंबरे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष बाळासाहेब बोराडे, डॉक्टर सेलचे डॉ. संतोष ढाकणे, विनोद गुंड, प्रेमचंद कोकाटे, तारळकर तात्या, सखाहरी गदळे, कॅप्टन नागरगोजे, गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे, अल्पसंख्याक विभागाचे सय्यद शरीफ आणि भागवत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय उर्फ पिंटू ठोंबरे म्हणाले की, या भागाचा रखडलेला विकास पालक मंत्री ना. धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून करणार असल्याचे अभिवचन त्यांनी दिले. 

तर उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील एकही शाळा किंवा वर्ग उघड्यावर भरणार नाही सर्व शाळांना इमारतीसाठी भरीव निधी देऊ. जिल्ह्यात काम करीत असताना शरद पवार, उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार, पालक मंत्री ना धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निधी कमी पडू जाणार नाही अशी गवाही दिली. 

दरम्यान कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका आणि आशा स्वयंसेविका यांचा राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे डॉ. संतोष ढाकणे यांनी अंबळाच्या बरडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात बजरंग सोनवणे व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला दहिफळ, हरगडवाडी आणि परिसरातील नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

----------------------------------------------

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel