*सालासार जिनींगवर शेतकऱ्यांडुन हमाली वसुल*

सोनपेठ/प्रतिनिधी

तालुक्यातील सालासार जिंनीग मध्ये शेतकऱ्यांकडुन हमाली वसुली करण्यात आल्याचा प्रकार घडला असुन हमाली देण्यास नकार देणाऱ्यांना अरेरावी केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

सोनपेठ तालुक्यातील करम येथील सालासार जिनींग मध्ये दि.३१ पासुन पणन महासंघाची खरेदी सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपला कापुस शासकीय खरेदीसाठी विक्रीस आणला होता.पणन विभागाने कापुस खरेदीत शेतकऱ्यांकडुन हमाली घेण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश दिलेले असतांना देखील सालासार जिनींगच्या मालकाने शेतकऱ्यांकडुन हमाली वसुली केली आहे.दरवर्षीही सदरच्या जिनिंगचालकाकडून शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक दिली जाते. गतवर्षी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यास टाळाटाळ करण्यात आली होती.खाजगी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसोबत जिनिंगचालकाचे आर्थिक हीतसंबध असल्याचा आरोप शेतकऱ्यांतुन करण्यात आला होता.यावर्षी सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आपला माल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला होता.मात्र हमाली देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्यांना वजनाची पावती देण्यात येत नव्हती.तर काट्यावर असलेल्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना अरेरावी केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये फिरत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.तसेच हमाली न देणाऱ्या शेतकऱ्यांना जिनींग बाहेर काढल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे.शासनाचे स्पष्ट आदेश असतानां शासकीय खरेदी केंद्रावर कापुस विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडुन अडवणुक करुन पैसै वसुल केल्या जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शेतकरी संघटनेने या बाबत सहाय्यक निबंधकांना पत्र देऊन ही अवैध वसुली तात्काळ थांबण्याची मागणी केली होती.त्यानुसार सोनपेठ येथील सीसीआयच्या खरेदी केंद्रावर ही हमाली वसुली बंद झाली पण पणनच्या करम येथील सालासार जिनींगवर मात्र हमाली घेत असल्याने शेतकऱ्यांनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

*हमाली न दिल्याने पावती दिली नाही:-रावसाहेब बचाटे शेतकरी*

करम येथील सालासार जिनींगवर कापुस उतरवुन घेतल्यानंतर पावती घेण्यासाठी गेलो असता हमाली मागितली हमाली ची पावती मागितली असता अरेरावी करण्यात आली.*

*अवैध वसुली करणाऱ्यांना धडा शिकवणार:-गोरवे*

शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडुन हमाली वसुल करु नये असे स्पष्ट निर्देश असतांना कापुस उत्पादकांकडुन अवैधरित्या हमाली वसुल करणाऱ्यांना शेतकरी संघटना धडा शिकवणार.शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर हमाली देऊ नये.हमाली मागत असल्यास शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा 

*विश्वंभर गोरवे*

*तालुकाअध्यक्ष शेतकरी संघटना*

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज