कुंभार समाजाच्या थापटन मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सामील व्हा - संतोष गोरे


-------------------------------------

प्रतिनिधी/माजलगांव

---------------------------

कुंभार समाजाच्या विविध मागण्यांसाठी दि. ५ जानेवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर कुंभार समाजाचा धडक थापटन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या न्याय हक्काच्या विविध मागणीसाठी काढण्यात आलेल्या थापटन मोर्चात माजलगांव मधील समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आव्हान कुंभार समाज संघटनेचे माजलगांव तालुका अध्यक्ष संतोष गोरे यांनी केले आहे. 

          कुंभार समाजाच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी दि.५ जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या या थापटन मोर्चात खालील मागण्यांचा समावेश आहे यात प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॉरिस (पीओफी) वरील बंदी उठवावी, समाजाला दहा हाजार ईलेक्ट्रिक चाक शासनाने मोफत वाटप करावे,श्रीसंत गोरोबा काका महामंडळामार्फत समाजाला कर्ज वाटप करण्यात यावे ६० वर्षावरील कुंभार समाजाच्या कारागीरांना मासिक देण्यात यावे,सामाजिक, शैक्षणिक आशा विविध कुंभार समाजाच्या समस्या आहेत या सह विविध मागण्यांसाठी दि.५ जानेवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर कुंभार समाजाचा थापटन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तरी माजलगांव तालुक्यातील कुंभार समाजाच बांधवांनी लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे कुंभार समाजाचे माजलगांव तालुका अध्यक्ष संतोष गोरे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज