जय हिंद सर
जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
महाराष्ट्र पोलिस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले नांदेड जिल्ह्याचे भुमिपुत्र जेवढे सरळ, शांत, संयमी स्वभावाचे तेवढेच कर्तव्य बजावताना कठोर भुमीका घेणारे नांदेड येथील रहिवासी भंडारा जिल्हायाचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक अनिकेत गंगाधर भारती यांना वाढदिवसा निमित्ताने ग्लोबल मराठवाडा च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
माराठवाडयातील नांदेड जिल्ह्यातील भुमिपुत्र अनिकेत भारती यांचे पदवीपर्यंत शिक्षण पिपल्स काँलेज नांदेड येथे झाले. त्यानंतर त्यांची स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून विक्रीवर निरिक्षक पदावर नियुक्ती झाली. दोन वर्षे नांदेड येथेच विक्रीकर निरिक्षक पदावर कर्तव्य बजावले मात्र त्यांचे पोलिस दलात वरिष्ठ अधिकारी होऊन जनतेची सेवा करत, गरीब पिडितांना न्याय मिळून देण्याचे स्वप्न होते ते त्यांना स्वस्त बसु देत नव्हते त्यांनी परत लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळून 2011 ला पोलिस उपाधिक्षक पदावर निवड झाली. नाशिक येथे पोलिस अधिकारी प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रोबेशनरी पोलिस उपअधिक्षक म्हणुन जळगाव येथे कर्तव्य बजावले. त्या नंतर वाशिम, तासगाव, उदगीर, सांगली, पुणे येथे पोलिस उपाधिक्षक पदावर सेवा बजावली. अतिशय शिस्तप्रीय अधिकारी असल्याने वाशीम जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या ईलिगल अँक्टिविटी ला थारा न दिल्याने व आपल्या कर्तव्याशी प्रमाणिक अधिकारी असल्याने त्यांची तासगाव ला बदली करण्यात आली. तासगाव म्हणजे आदर्श गृहमंत्री आर आर पाटलांचे गाव ज्यांनी महाराष्ट्र पोलीस दलांसाठी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केले आहे पोलिसांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आबांनी खूप मेहनत घेतली अशा आबांच्या जन्मभूमीत काम करण्याची
संधी मिळाल्याचे अनिकेत भारती यांनी ग्लोबल मराठवाडाशी बोलतांना सांगितले. व तासगावात उत्कृष्ट सेवा भारती यांनी बजावली. त्यानंतर त्यांची बदली लातुर जिल्ह्यातील उदगीर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर झाली. दोन वर्षे उदगीर मध्ये आपल्या सोशल पोलिसींग च्या माध्यमातून उदगीर करांची मने भारती यांनी जिंकली. त्यानंतर परत त्यांची बदली सांगली जिल्ह्यात झाली सांगली जिल्ह्यात कार्यरत असतांना वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्यावर पंढरपूर बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली हे काम त्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. त्यानंतर त्यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली.एक वर्षापुर्वी त्यांना अतिरिक्त पोलिस अधिक्षक पदावर प्रमोशन मिळाल्याने त्यांची भंडारा जिल्हा येथे अतिरिक्त पोलिस अधिक्षक पदावर नियुक्ती झाली. भंडारा येथे रूजु होताच भारती यांनी विषेश अभियान राबवून भंडारा जिल्ह्यात महिला आणि पुरुष हरविल्याच्या 742 तक्रारी दाखल होत्या त्यापैकी 617 जणांना शोधून काढत घरी पोहचविण्याचे काम अनिकेत भारती यांनी केले. ज्यामध्ये विषेश म्हणजे हरविलेल्या 500 मुलींपैकी 429 मुलींना घरी सोडण्याचे काम भारती यांनी केले. आजही ते भंडारा जिल्हयात अतिरिक्त पोलिस अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या सोबतच त्यांच्या पत्नी गितांजली ताई यांनी भंडारा येथील शासकिय निवासस्थानी झाडे लाऊन नंदनवन फुलवले आहे ज्याची दखल खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. आशा कर्तबगार पोलिस अधिकारी यांना ग्लोबल मराठवाडा चा सलाम व त्यांना उदंड आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना
जय हिंद साहेब....



COMMENTS