परळी(प्रतिनिधी) दि.13शहरातुन ग्रामिण भागात देशी,विदेशी दारू अवैद्यपणे मोटारसायकलवरून घेवुन जात असल्याची माहिती मिळाल्यावर शहर
पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी दोघांना 28,808 रूपयांच्या मुद्देमालासह अटक केली असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला
आहे.
या बाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली माहिती अशी कि दि.12 जानेवारी रोजी 16:15या वेळी वैद्यनाथ मंदिर रोडने मोटारसायकल क्र, MH44L6997 वर दोघे जण देशी व विदेशी दारू अवैद्यपणे ग्रामिणभागात घेवुन जात असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या शहर पोलीस
स्टेशनचे सपोनी खरात यांना मिळाल्यावर
त्यांनी सापळा रचुन सदर मोटारसायकल
अडवुन पंचासमक्ष तपासणी केली असता
मोटारसायकलवर असलेल्या पोत्यांमधीं मॅकडाल,इंपेरियर ब्लु या विदेशी दारूच्या
बाटल्यासह टँगो देशीदारूच्या बाटल्या मिळाल्या हे घेवुन जात असलेले संजय रामभाऊ इंगळे व शेख जमिर शेख कलाम रा.मिरवट ता. परळी यांना दारूच्या बाटल्या व मोटारसायकल एकुण किंमत 28808रूपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं.07/2021 कलम 65(ई) मुंबई दारूबंदी नुसार गुन्हा दाखल केला आहे .सदर कामगिरीत पोह मुरकुटे
पो.ना. सुर्यवंशी,भताने,पो.काॅ. बुड्डे सहभागी
होते तरपुढील तपास पोह जि.एल बडे हे करीत आहे.
COMMENTS