धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबादच्या ग्रामीण रुग्णालयात आज कोव्हीडच्या लसीकरणास प्रारंभ झाला असून या लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पद्मा रेड्डी सतपालवार व जिल्हा परिषद मांजरम गटाच्या सदस्य तथा आमदार राजेश पवार यांचे प्रतिनिधी म्हणून पुनमताई पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. आज लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, तथा अंगणवाडी सेविका यांना कोव्हीडची लस देण्याचे ठरले. यानुसार आज तब्बल तीनशे कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली होती. पण जवळपास 103 जणांचेच आज लसीकरण करण्यात आले. लसीकरण करताना ग्रामीण रुग्णालयाने नियमावलीची पूर्ण खबरदारी घेतली होती. सुरुवातीस नोंदनी, यानंतर वेटिंग हॉलमध्ये प्रतीक्षा करणे, व नंतर एका एका कर्मचाऱ्यानां लस देणे व लस दिल्यानंतर अर्धा तास विश्रांतीची व्यवस्था व त्यानंतर काही प्रतिकूल परिणाम झाले तर आपत्कालीन व्यवस्थाही तत्पर होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्या पुनमताई पवार यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरणा संदर्भातले गैरसमज दूर करीत त्यांचे मनोधैर्य वाढविले. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा हजार पेक्षा जास्त जणांना कोव्हीडचीची लस देण्यात आली असून, या लसीचे कोणतेच प्रतिकूल परिणाम झालेले नाहीत असे सांगत आम्हाला जर ही लस अगोदर घ्यावयास सांगितले तर ती मी घेतली असती तुम्ही घाबरून जाऊ नका असा सल्ला त्यांनी दिला. या कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद्माताई सतपालवार, जिल्हा परिषद सदस्या पुनम ताई पवार, प्रभारी उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार दत्तात्रय शिंदे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष जी. पी. मिसाळे, पत्रकार संजय कदम, सुरेश घाळे, डोईवाड, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष अंकित गोधा, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर एकबालशेख, तालुका आरोग्य अधिकारी खंदारे, जारिकोट आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सौ. शेख, आरोग्य विस्तार अधिकारी लोकावाड रेड्डी, ज्येष्ठ परिचारिका महामुनी, यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यास तत्पर होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत श्री. व्ही. एस. पाटील, सौ. बिचकुंदे मॅडम मुख्याध...
-
उदगीर / प्रतिनिधी : वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे。 पर्यावरणाचे रक्षण, मानवी आरोग्य व स्वच्छतेसाठी योग्...
-
नांदेड, दि. २२- जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रप्रमुख मर्यादित स्पर्धा परीक्षेतील पदोन्नती प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील रि...
-
सेलू: येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या प्रांग...
-
आज दि. 10 जुलै 2024 रोजी नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपची तीव्रता रिष्टर ...

COMMENTS