नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
महात्मा ज्योतीबा फुले योजना २०१९ मधील सर्व १४०० शेतकऱ्यांचे कर्जमाफी झालेल्या व इतर १०१ अशा पंधराशे शेतकऱ्यांना नव्याने ९ करोड १५ लाख रुपयाचे पिककर्ज वेळेत वाटप करुण बँकेने उद्दिष्ट पुर्ण केले असल्याची माहीती शाखा प्रबंधक नवीन प्रजापती स्टेट बँक आँफ इंडीया मुक्रमाबाद यांनी दिली.
निसर्गाचा समतोल बिघडल्याने गेल्या चार वर्षापासून सत्ततची नापीकी व कर्जबाजारीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी महात्मा ज्योतीबा फुले योजने अंतर्गत दोन लाखा पर्यंत सर्वात मोठी कर्जमाफी देऊन राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलासा दिला होता.ऐन पेरणी काळात स्टेट बँक आँफ इंडीया मुक्रमाबाद मधील सर्व कर्जमाफी झालेल्या १४०० शेतकऱ्यांना व इतर १०१ सह पंधराशे शेतकऱ्यांना नव्याने वेळेत ९ करोड १५ लाख रुपयाचे पिककर्ज वाटप केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता.
आणखी ३५० शेतकऱ्यांचे पिककर्जाचे नवीन प्रस्ताव मुख्य ब्रँच नांदेड येथे प्रलंबीत आहेत.मंजुरी येताच त्यांना सुध्दा तात्काळ पिककर्ज शाखेकडून वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शाखा प्रबंधक नवीन प्रजापती यांनी दिली आहे.कोरोणा महामारीचे संकट असताना ही आपल्या जिवाची परवा न करता शाखेकडून वेळेत शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करुण उद्दिष्ट पुर्ण केले आहेत.याकामी महेश नाईक,लोकेश कोकडे,विजय शाहु,अंकुश मंदे,उमाकांत जावळे,प्रकाश घंटेलवाड,राजु गायकवाड आदीने परिश्रम घेतले.

COMMENTS