नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
शहरातील कुशिनारा बौध्द स्मशान भूमी येथे दरवर्षीप्रमाणे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञान सागराच्या प्रतिमेस विविध पदाधिकारी व बौद्ध उपासक यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर पंचशील ध्वजारोहण नगरसेवक देविदास बोमनाळे यांच्या हस्ते करण्यात आले व सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले असून या अभिवादन कार्यक्रमास भाऊराव पा.चव्हाण, गंगाधर पा.कल्याण, गजानन चव्हाण, धनराज शिरोळे, पीआय पडवळ, सय्यद एजाज, कैलास भालेराव, माधव पा.कल्याण,आयोजक राजेंद्र सोनकांबळे, दामोदर सोनकांबळे, राजू बेळगे, निवृत्ती हनुमंते, प्रकाश पोटफोडे, संभाजी पोटफोडे, संतोष भालेराव, सुभाष पवार, राहुल सोनकांबळे, शेषराव वाघमारे, गौतम सुर्यवंशी, चंद्रकांत तमलुरे, पिराजी सोनकांबळे, अतुल मंगरूळे, संजय भद्रे, गणपत बेंद्रिकर यासह बौध्दउपासक व शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नायगांव ( नगरपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष शरद भालेराव, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, नगरसेवक रमेश शिंदे, संजय चव्हाण, माणिक चव्हाण, श्रीनिवास शिंदे, विश्वनाथ बेळगे, लिपिक रामेश्वर बापुले, श्रीधर कोलमवार, रमेश चव्हाण, मुन्ना मंगरूळे, बसवंत कल्याण, शिवाजी चव्हाण, रमेश भालेराव, अजय सूर्यवंशी, पप्पू कामळजकर आदीजण उपस्थित होते. तर शहरातील रविदास नगर येथे संत रविदास महाराज युवा मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, यावेळी नगरसेवक रमेश शिंदे, आयोजक राजेंद्र कांबळे, आर आर शिंदे, एस.टी.जाधव, कपिलेश्वर नलबलवार.
गंगाधर पांचाळ, पीएच कदम, गंगाधर सोनटक्के, उपस्थित होते. नायगांव येथील दत्त जुनियर कॉलेज मध्येही ही डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या ज्ञानसागरास केंद्र संयोजक शरद इंगळे, केंद्र सहाय्यक लक्ष्मण तळणे, स्वप्निल धात्रक व प्रा. शिंदे यांनी अभिवादन केले.



COMMENTS