केज (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांच्या हस्ते भाटूंबा येथे ४० लक्ष किंमतीच्या कामांचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक १८ डिसेंबर २०२० रोजी संपन्न झाले.
यात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नवीन ईमारतीचे बांधकाम,संरक्षण भिंत व ईमारती दुरुस्ती बांधकाम करण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुधाकर धपाटे होते.तर प्रमुख उपस्थिती गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे,सरपंच सुनील धपाटे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक चौरे सर यांनी केले यावेळी बजरंग सोनवणे यांचे आभार मानले तर सुनील केंद्रे यांनी मार्गदर्शन करतांना भाटूंबा जिल्हा परिषद शाळेतील भौतिक सुविधेसाठी नाही तर तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेच्या भौतिक विकासासाठी निधी सोनवणे यांनी दिला आहे.
या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर चौरे,प्रकाश चौरे, अभिजित चौरे, मदन तपसे,शिवाजी शिंपले,किशोर थोरात,भागवत सोनवणे,भाऊसाहेब गुंड,राहुल थोरात ,संभाजी लोमटे,नवनाथ अंबाड,संदीप करपे,बाळासाहेब जगताप,शाम चटप, तसेच शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षकवृंद, व गावातील नागरिक उपस्थित होते.

COMMENTS