मस्साजोग प्रतिनिधी- केज शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या मेघराज हॉटेल चे मालक मेघराज प्रल्हादराव रांजणकर यांचे दिनांक 16 डिसेंबर बुधव...
मस्साजोग प्रतिनिधी-
केज शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या मेघराज हॉटेल चे मालक मेघराज प्रल्हादराव रांजणकर यांचे दिनांक 16 डिसेंबर बुधवार रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय 49 वर्ष होते मेघराज राजंणकर हे संध्याकाळी हॉटेलवर बसलेले असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते त्यामुळे त्यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाईला पाठवण्यात आले मात्र अंबाजोगाई कडे जात असता रस्त्यातच मेघराज राजंणकर यांची प्राणज्योत मालवली व स्वाराती रूग्णालयात गेले असता मात्र तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.मेघराज हे अत्यंत गरिब व मनमयाळु स्वाभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले ,एक मुलगी असा परिवार आहे

COMMENTS