सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत समाजातील निराधार वंचितांना लाभ मिळावा यासाठी स्थानिक तहसीलदार यांना सदस्य सचिव घोषित करून स्थानिक सामाजिक व अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांची समिती स्थापन करण्यात येते.
याअंतर्गत गोटेगाव ता. केज येथील बालासाहेब बोराडे यांची अध्यक्षपदी तसेच कपिल मस्के, सौ. अश्विनी सोनवणे, सतीश गोरे, वचीष्ट सांगळे, मधुकर तपसे, लक्ष्मण काळे, श्रीकांत घुले, रत्नाकर शिंदे, नारायण शिंदे यांची विविध क्षेत्रातील अशासकीय सदस्य पदी तर केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची शासकीय प्रतिनिधी म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे. तसलीदार, केज हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
समितीला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा योग्य वापर करून या योजनाचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करत ना. धनंजय मुंडे, माजी खा.रजनीताई पाटील,जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे ,कॅाग्रेस जिल्हाध्यक्ष पापा मोदी , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळुक तसेच माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS