वंचित बहुजन आघाडी जि,प,प,स, निवडणुका स्वबळावर लढविणार:- युवा नेते सुशिल कोळेकर

 मादळमोही दि,२९ (प्रतिनिधी):- शिरुर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढविणार आहे, त्यासाठी योग्य उमेद्वाराला कार्य पाहुन संधी दिली जाणार आहे, आमचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी तळागळा प्रयत्न जनहिताचे काम करत आहे, त्यामुळे मतदारांनी वंचित बहुजन आघाडीवर मोठा विश्वास टाकला आसल्याचे युवानेते सुशिल बापु कोळेकर यांनी सांगितले,

     सतत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम बहुजन वंचित आघाडी कडुन होत आहे,अनेक निवडणूकात हे दाखवुनही दिले आहे,सर्वसामान्याच्या हितासाठी बहुजन वंचित आघाडी साठी रस्त्यावर उतरुन न्याय हक्कासाठी सतत झगडत आहे, त्यामुळे मतदार व जनतेच्या विश्वहार्तास पात्र ठरले आहे , हा अजेटां वंचित बहुजन आघाडीचा आहे,त्यामुळे निवडणुकीत आमची ताकद सर्वच पक्षाने आजमावून पाहीले आहे,या सर्वच गोष्टींचा विचार करुन आमचे नेते बाळासाहेब आबेंडकर यांचा विचार धारांनी पुढील जिल्हा परिषद व पंचायत समित निवडणूकीत शिरुर कासार तालुक्यातील सर्व गट आणि गणात उमेद्वार उभे करुन सर्वच जागा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढविणार आसल्याची माहीती युवानेते सुशिल बापु कोळेकर यांनी दिली,

टिप्पण्या