केज प्रतिनिधी
कुंभार समाजाच्या नावाचा वापर करून ५ जानेवारी रोजी निघणाऱ्या मोर्चाचा आणि बीड जिल्हा कुंभार समाजाचा संबध नाहीच पण बीड जिल्हा कुंभार बांधवाचा विरोध आहे कारण सध्या बीड जिल्हातील तमाम कुंभार बांधव संक्रात कुंभार कामात व्यस्त आहे . भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी पीओपी वर बंधी केली असली तरी त्या विषयी महाराष्ट्रात आघाडी सरकारने एक कमेटी स्थापन करणार असून त्याचे रिपोर्ट कोर्टाला आणि भारत सरकारला देऊन पीओपी बंधी संदर्भात निर्णय होईल . पीओपी पर्यावरणास हानीकारक आहे का नाही याचे स्पष्टीकरण कमेटी देईल. महाराष्ट्रात कुंभार समाजापेक्षा इतर समाजाचे पीओपी मुर्ती कारखाने जास्त आहेत .एनटी आरक्षण ही मागणी चुकाची आहे. कुंभार समाज बलुतेदार आहे . मायक्रो ओबीसी आहे. रोहाणी आयोगाने मोस्ट बॅकवर्ड क्लास ओबीसी मधील समाजाना ९ टक्के आरक्षण देण्याचा अहवाल दिला आहे . मोस्ट बॅकवर्ड क्लास या मध्ये बलुतेदार अलू तेदार यांचा समावेश असल्यामुळे आमची रोहाणी आयोगाची मागणी आहे .एनटीची नाही. खादी ग्राम उद्योग आयोगामार्फत देशभरात महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था आणि आ भा प्र कुं महासंघ यांच्या मार्गदशना ने इलेक्ट्रीक चाक वाटप चांगल्या प्रकारे चालू आहे , बीड जिल्हा मध्ये २० चाकाचे वाटप झाले आसून, आणखी २०० चाके वाटप करण्याची सर्व तयारी झाली आहे . तेरला पर्याटन तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळावा यासाठी आखिल महाराष्ट्र कुंभार सामाज विकास संस्था यांचे प्रयत्न चालू आहेत तेही अंतीम टप्यात आहे . मातीकला बोर्डाची नवीन नियूक्ती आघाडी सरकारने केली नाही तरी पण ५० कोटी रूपये माती कला बोर्डावर टाका ही मागणी चुकीची आहे .प्रथम नवीन मातीकला बोर्डावर निर्वाचित मंडळ स्थापन करा अशी आमची मागणी आहे . तेर येथे तीर्थक्षेत्राला अ दर्जा मिळण्यासाठी अ. म .कुंभार विकास संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न असून यश लवकर मिळेल . या मोर्चा मधील मागण्या चुकीच्या वाटत असल्यामुळे तसेच काही लोकांची राजकीय आर्थिक दुकानदारी चालावी या साठी बीड येथे ५ जानेवारीला मोर्चाचे नियोजन केले असल्यामुळे जिल्हा कुंभार समाज विकास संस्था तसेच तमाम बीड जिल्हा कुंभार समाज बांधव यांचा विरोध आहे . आशा संस्ट बाजी करणाऱ्या , भंपक बाजी करणाऱ्याच्या भूल थापाना बीड जिल्हा कुंभार बांधव बळी पडणार नाही

COMMENTS