परभणी दि
आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव शाखा परभणीच्या वतीने कोविड सेंटर औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथील आयोजित कार्यक्रमात प्रेरणाताई वरपुडकर यांनी परभणी कोंविड सेंटर च्या सर्व टीमचे त्यांच्या कार्याची दखल घेऊन मानव सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादित केले,
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रशिक्षक प्रा डॉ सुरेश शेळके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी युवक कांग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस सौ प्रेरणा ताई वरपूडकर जिल्हा अपर कोषागार अधिकारी सौ ज्योती बगाटे जिजाऊ ज्ञान तीर्थ चे संस्थापक प्राचार्य नितीन लोहट आधार मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट सुनील सौंदरमल ,प्रा राजेश सुरवसे ,डॉ धर्मराज चव्हाण, डॉ पंडित पुरी, डॉ सुधाकर पोले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते युवा नेत्या यावेळी मंचावरील जिल्हा अप्पर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे यांनीही कोविड योध्याच्या सन्मानार्थ त्यांचे कौतुक करीत पुढील काळात आजाराचा सामना करण्यासाठी सर्वांना बळ मिळण्याची कामना व्यक्त केली, यावेळी सेंटरचे प्रभारी डॉक्टर पंडित पुरी प्राचार्य नितीन लोहट यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या अध्यक्षीय समारोपात डॉ सुरेश शेळके यांनी सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचे आणि एकूणच समाजामध्ये आपल्या जीवाची, संसाराची परिवाराची पर्वा न करता काम करणाऱ्या सर्व योद्धा टीमचे मनस्वी अभिनंदन व्यक्त करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आधार मल्टीस्टेट चे अध्यक्ष एडवोकेट सुनील सौंदरमल यांनी बँकिंग क्षेत्रातील कार्यासह आधार परिवार सर्वसामान्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ,क्रीडा, साहित्य इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्या यशोमर्गामध्ये आधार बनण्याची भूमिका विशद केली यावेळी योद्ध्यांच्या सन्मान पत्राचे वाचन प्राध्यापक राजेश सुरवसे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन एस एस शेंगोळे सर यांनी मानले परभणीतील या अद्वितीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन सपाटे शाखाधिकारी, परमेशर भंडारे, भीमराव जाधव, व युवराज शिंदे यांनी प्रयत्न केले

COMMENTS