. मस्साजोग प्रतिनिधी दि.2 केज तालुक्यातील केळगाव परिसरातील नागरिकांना बिबट्याचे बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान गावातील तलावावरून पाणी प...
. मस्साजोग प्रतिनिधी दि.2 केज तालुक्यातील केळगाव परिसरातील नागरिकांना बिबट्याचे बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान गावातील तलावावरून पाणी पिऊन सांडव्याच्या भिंतीवर चढला व भिंती शेजारील लिंबाच्या झाडावर दहा मिनिट बसला व आबासाहेब नेहरकर रा.केळगाव हे त्यांच्या शेतातील ज्वारीला पाणी देत असताना त्यांना दीडशे फूट अंतरावरून त्यांनी दिसला व नरभक्षक बिबट्याने त्यांना पाहिले व त्यांच्या शेतातून ते घाबरून त्यांच्या घराच्या दिशेने पळाले व तो नरभक्षक बिबट्या लिंबाच्या झाडावरुन उडी मारुन सांगवीच्या दिशेने गेला अशी माहिती आबासाहेब शंकर नेहरकर रा. केळगाव यांनी दिली आहे. व केळगाव येथील काही मुली शेतामध्ये कापूस वेचत असतांना तो नरभक्षक बिबट्या सांगवीच्या दिशेने जात असताना पाहिला व त्या घाबरून ओरडत ओरडत घराच्या दिशेने पळाल्या . तरीही केळगाव परिसरातील नागरिकांनी व सावधान राहण्याची गरजेचे आहे शिवारातील अनेकांना या बिबट्याचे दर्शन घडल्याने केज तालुक्यातील केळगाव ,बेलगाव, आरणगाव ,मस्साजोग, परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी केळगाव तलावात, त्या नरभिक्षक बिबटयाचे ठसे आढळून आल्याने केळगाव, बेलगाव , आरणगाव,व मस्साजोग परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने याची दखल घेऊन या बिबट्याचा मोठा अनर्थ घडण्याआधी बंदोबस्त करावा अशी मागणी केज तालुक्यातील केळगाव बेलगाव आरणगाव, मस्साजोग परिसरातील नागरिकांनी, केली आहे .

COMMENTS