केज तालुक्यातील तेवीस ग्रामपंचायती पैकी नारेवाडी ग्रामपंचायतीचे निवडणुकीसाठी सात अर्ज दाखल


अनंत जाधव/मस्साजोग :- केज तालुक्यातील २३ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी एका गावातील सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून इतर बावीस गावातून मात्र अद्याप एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १५ जानेवारी रोजी केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती पैकी वाघेबाभूळगाव, मुंडेवाडी, नारेवाडी, विडा, आंधळेवाडी, कोरडेवाडी, शिंदी, येवता, काशीदवाडी, सुकळी, मोटेगाव, पैठण, बाणेगाव, दरडवाडी, धोतरा, घाटेवाडी, गप्पेवाडी, बोबडेवाडी, लाखा, भोपला, पाथरा, रामेश्वरवाडी आणि जाधव जवळा या गावात २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होत आहेत. दि .२३ डिसेंबर पासून दि. ३० डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्राची विक्री व स्वीकृती करण्यात येणार आहे. दरम्यान दि २४ डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी या २३ गावांपैैकी नारेवाडी येथील सात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहेत‌ व त्या पैकी चार महिला १) चौरे अर्चना राजेंद्र २)उगलमुगले संगीता नानाभाऊ ३)चौरे द्रोपदी शेषराव ४)उगलमुगले उर्मिला दादाराव व तीन पुरुष १)चौरे आसाराम गोवर्धन २) चौरे उत्तम भानुदास ३)उगलमुगले कृष्णा शाहूराव असे चार महिला व तीन पुरुष आहेत व आज एकुण सात उमेदवाराचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

टिप्पण्या