माजलगाव/प्रतिनिधी
शहरातील आझादनगर येथील १०० ते १५० घरावरुन गेलेल्या मुख्य विद्युत तारांमुळे घातपात व जिवीत हानी होण्याची शक्यता असतांना व येथे अनेक वेळा शॉक अपघात होऊन देखील हि विद्युत तार काढण्यासाठी उदासीन असणाऱ्या एम.एस.ई.बी.कार्यालयाच्या निषेधार्थ दि .०८ डिसेंबर २०२० रोजी संबधीत कार्यालयासमोर आत्मदहन करू असे सय्यद सलीम बापू यांनी निवेदन दिले आहे .
उपरोक्त विषयी येथील सामाजिक कार्यसकर्ते व लोकतांत्रिक जनता दलाचे बीड जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू फत्तु यांनी निवेदन सादर करून खालील मागणी पूर्ण न झाल्यास आपण नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नासाठी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन त्यांनी दिले आहे त्यांनी म्हंटले आहे की आपण या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलन , उपोषण , मोचें व आंदोलन करुन देखील जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या विद्युत वितरण कार्यालयाकडून फक्त टोलवा टोलवी होत आहे .व जवळपास १०० ते १५० घरांवरुन गेलेली हि विद्युत वाहीनीची मोठी तार गेलेली असल्याने येथे नेहमी पार्कीग होते .ब तार तुटून घरावर पडते .जिल्हा परिषद नंबर १ शाळे मागच्या रोडवरच विद्युत पोल असून तो तात्काळ शाळेत हटवा म्हणुन असे विद्युत तारेच्या प्रवाहाने मरण येण्या पेक्षा विद्युत वितरण कंपनीस जाग आणण्यासाठी मी ०८ डिसेंबर २०२० रोजी या कार्यालया समोर आत्मदहन करत असल्याचा इशारा लोकतांत्रिक जनता दलाचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी समधीत कंपनीला दि २६ नोव्हेंबर २०२० रोजी दिलेल्या निवेदनातून दिला आहे या दरम्यान काही अनुचीत प्रकार घडल्यास यास संबधीत अधिकारीच जबाबदार राहतील याची संबधीतांनी नोंद घ्यावी .असे ही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे

COMMENTS