केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे ठिबक व तुषार सिंचन चे मागील वर्षीच्या अनुदान देण्यात यावे व नवीन खरेदी करण्यासाठी ऑनलाइन साईड सुरू करण्यात यावी या मागणीसाठी केज तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदन देण्यात आले
मागील वर्षी दुष्काळ असल्याने थोड्याशा पाण्यावर काहीतरी शेती करता येईल या हेतूने भरपूर प्रमाणात ठिबक व तुषारची खरेदी शेतकऱ्यांनी केली परंतु त्यांना अद्यापही मिळणारे अनुदान मिळालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील मशागतीसाठी आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे तसेच चालू वर्षातही शेतकऱ्यांना ऊस,केळी, हळद,डाळींब तसेच फळबाग लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात ठिबक ची गरज असून शेतकऱ्यांना त्यासाठी आवश्यक ती कारवाई व पाठपुरावा करून तात्काळ ऑनलाइन साठी साईड चालु करून द्यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप शितोळे,अमरजीत धपाटे,संजय लोंढे,राहुल पाटील,श्रीराम देशमुख, ओमप्रकाश गुजर आदींच्या स्वाक्षरी आहेत

COMMENTS