आष्टी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने ऊसाचे पीक शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार शेतकऱ्यांनी पाण्याचा फायदा घ्यावा

मा. आ. भीमराव धोंडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कडा कारखाना सुरु करावा  आष्टी (दादासाहेब बन)       आष्टी पाटोदा शिरूर या तीनही तालुक्यात या...

मा. आ. भीमराव धोंडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कडा कारखाना सुरु करावा 

आष्टी (दादासाहेब बन) 

     आष्टी पाटोदा शिरूर या तीनही तालुक्यात यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने सिंदफना ,भातोडी ,ब्रह्मगाव, बेलगाव ,मेहकरी,कांबळी, देवी निमगाव, चोभा निमगाव, उंदरवाडी, डोईठाण ,किन्ही, ईमणमगाव आशा मोठ्या असलेले साठवण तलाव पूर्णपणे पाण्याने भरलेले असल्याने या पाण्याच्या माध्यमातून शेतीला बारामही पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे .या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांनी स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी एक रकमी व ठोक उत्पादन पीक म्हणून उसाची लागवड करावी .या ऊस लागवडीतून शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये लक्षणीय बदल होऊ शकतो. आज पर्यंत या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी तूर ,कापूस ,सोयाबीन,मुग,उडीद, कांदा ,मका ज्वारी ,बाजरी ,गहु,हरभरा हे पीक घेत आलेले आहेत .या पिकांना बाजारपेठेमध्ये जेमतेम भाव मिळतो त्याचबरोबर या पिकावर रोगराई, नैसर्गिक आपत्ती ,शारीरिक कष्ट व आर्थिक खर्च अधिक होऊन शेतकऱ्यांचा संसार चालेल इतकेही उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र पष्ट झाले आहे ,आजची या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील शेतीला बारामही पुरेल इतका प्रचंड पाणीसाठा उपलब्ध झाल्या असल्याने ज्या भागामध्ये ऊस लागवडी योग्य क्षेत्र आहे अशा भागांमध्ये शेतकऱ्यांनी ऊस पिकाची लागवड करावी. उसाला मिळणारा भाव योग्य व ठरवून दिलेला आहे.या पिकासाठी अधिकचे कष्ट नसते या पिकावर रोगराईचे प्रमाणही अत्यल्प असल्याने याचाही खर्च वाचतो. नैसर्गिक आपत्तीतही अपायकारक ठरत नाही. आणि सर्वात मोठी बाब म्हणजे या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो आर्थिक फायदा होतो एकरकमी मोठी रक्कम मिळते या माध्यमातून शेतकऱ्याचा आर्थिक बाबी सुधारण्यास मोठी मदत होईल .आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ऊस पिकाचे उत्पादन केले तर या उसासाठी जवळचा कारखाना म्हणून कडा सहकारी साखर कारखाना सुरू होणे गरजेचे आहे .यासाठीही मा.आमदार भीमराव धोंडे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत .या माध्यमातूनही अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो ऊसतोड कामगारांची होणारी स्थलांतरही रोखण्यास मदत होईल अशी परिस्थिती आजच्या नैसर्गिक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने निर्माण झाली आहे याचा फायदा शेतकऱ्यांनी पुरेपूर घ्यावा आणि अनेक वर्षापासून येत असलेली आर्थिक संकटे दूर होण्यास आज ऊस पीक हे एकमेव पीक महत्वाचे ठरू शकते. मागील काळामध्ये या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना हंंगामी पिकाच्या माध्यमातून खूप मोठे नुसकान झाले .दुबार पेरणी,बोगस बियाणे,किड अळी,बोंडंआळी,लष्करीअळी,करपा,लाल्या,उन्नी,जास्त पावसाने पीके गेली,वेळेत मजुर न मिळल्याने पीक काढणीस उशीर,बाजारभाव कमी जास्त,उत्पादीत पीकाची गुणवत्ता अशा अनेक कारणांमुळे अशा हंगामी पिकांसाठी खर्च जास्त आणि आर्थिक फायदा कमी असल्याचे पहावयास मिळत आहे. याकरिता मागील दोन-तीन वर्षाची नुसकान भरून काढण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांनी उसाच्या पिकाची लागवड करावी. आर्थिक जीवनमान उंचवावे अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे चित्र आज सर्वत्र निर्माण झालेले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group