नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
भारतीय संविधानाचे एकमेव शील्पकार महामानव,विश्वरत्न, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महपरिनिर्वान दिना निमीत्त मुखेड तालुक्यातील मौजे बेटमोगरा येथील धम्मशील बुद्ध विहार येथे महामानव डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.६ डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान आयोजीत करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस संपुर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय, महाकारूनीक, तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुण अभिवादनपर सामुदायीक
आदरांजली वाहीन्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाला सामाजीक कार्यकर्त्या ललीताबाई सोनकांबळे (माजी ग्रा.पं. सदस्य),निवृत्ती पोटफोडे, माधव सोनकांबळे,प्रल्हाद सोनकांबळे, माजी सरपंच सुरेश नवलेकर,रामजी सोनकांबळे, यशवंत सोनकांबळे, सतिश सोनकांबळे,मष्णा गायकवाड,दिलीप भद्रे,राहुल सोनकांबळे, बेटमोगरा येथील रमाई फाऊंडेशन चे सचिव तथा दै.लोकप्रश्न चे मुखेड तालुका प्रतिनीधी निर्भीड पत्रकार भारत सोनकांबळे,सुनील सोनकांबळे, यादव सोनकांबळे शंकर सोनकांबळे, नागेश सोनकांबळे, प्रितम सोनकांबळे
इत्यादींनी यावेळी विश्वरत्न, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरीनिर्वाण दिनानिमीत अभिवादनपर सामुदायीक आदरांजली वाहीली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप भद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील सोनकांबळे यांनी व्यक्त केले.

COMMENTS