दिंद्रुडचे स.पो.उप.नि. अनंतराव लोंढे सेवानिवृत्त ■ पोलीस ठाण्यात भावनिक निरोप समारंभ


दिंद्रुड दि.31 (प्रतिनिधी) :- माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अनंतराव लोंढे यांना 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्ती मिळाली. त्यांनी या ठाण्यात गेल्या सात वर्षांपासून लोकाभिमुख सेवा दिली. त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम पोलीस स्टेशनच्या आवारात गुरुवारी दुपारी संपन्न झाला. त्यांना निरोप देतांना अनेकांच्या पापण्या ओल्या झाल्या तर लोंढे यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

        दिंद्रुड पोलीस स्टेशनला कार्यरत असतांना लोंढे यांनी पोलीस आणि जनता यांचा नेहमीच समन्वय ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हद्दीतील अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक भांडणे तडजोडीतुन मिटवली. त्यांच्या मनमिळाऊ वृत्तीमुळे ते परिसरात लोंढे बाबा म्हणून परिचित आहेत. मूळचे केज तालुक्यातील असलेले लोंढे हे गेले छत्तीस वर्ष पाच महिने पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत. 

        निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी दिंद्रुड पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि शंकर वाघमोडे होते. तर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, जेष्ठ नेते रामभाऊ मायकर, पत्रकार संतोष स्वामी, सरपंच खंडागळे आदींसह पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सौ मंगल, चिरंजीव अशोक, गणेश, मुलगी विद्या सह अनंतराव लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. 

          लोंढे यांनी परळी शहर, परळी ग्रामीण, जळगाव, केज, धारूर, बीड शहर व दिंद्रुड आदि पोलीस स्टेशन मध्ये छत्तीस वर्ष पाच महिने पोलीस सेवा बजावली.मात्र या कार्यकाळात सेवा पुस्तिकेवर कसलाही वाईट शेरा नसणारा कर्मचारी म्हणून आम्हाला लोंढे यांचा अभिमान असल्याचे सपोनि शंकर वाघमोडे म्हणाले. प्रास्ताविक पत्रकार बंडू खांडेकर यांनी तर आभार फौजदार विठ्ठल शिंदे यांनी मानले. यावेळी लोंढे यांचा पोलीस कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने परिवारासह सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या
Popular posts
मुंबई पोर्ट ट्रस्टमधून सामाजिक व राजकीय कार्यकर्ते राजेंद्र खोपडे सेवानिवृत्त*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील आदर्श कामगार कार्यकर्ते विजय चोरगे सेवानिवृत्त*
इमेज
माहूरचे वन परीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी केलेल्या बोगस कामाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा
इमेज
शैक्षणिक साहित्यांनी महामानवाला अभिवादन करावे एक वही एक पेन अभियानचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र
इमेज
*वीरशैव लिंगायत समाजाने संघटित झाल्याशिवाय प्रगती शक्य नाही* - रामदास पाटील सुमठाणकर यांचे कपिलाधार धर्मसभेत आवाहन.
इमेज