र रइतापर
रमेश इतापे केज
केज तालुक्यातील 114 ग्रामपंचायती पैकी 23 ग्रामपंचायतीच्यानिवडणुका सद्या होत असून शेवटच्या तीन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक होत असलेल्या गावातील उमेदवारांची व हौश्या नौशांची प्रचंड गर्दी दिसून आली. यावेळी महिला उमेदवारांची संख्या जास्त दिसत होती. याबाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील एकूण 114 ग्रामपंचायती पैकी 23 ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच होत असून उमेदवारी अर्ज भरण्याची 30 डिसेंबर ही शेवटची तारीख असल्याने त्या अगोदर दोन दिवसापासून ते बुधवारपर्यंत केज तहसील व परिसर गर्दीने गजबजून गेला होता. काल भरलेल्या ऊमेद्वारी अर्जाची छाननी 31डिसेंबर 2020 रोजी सकाळी अकरा वाजले पासून ते अर्ज संपेपर्यंत होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दि. 4 जानेवारी 2021 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप केले जाणार असुन. वरील ग्रामपंचायतचे निवडणूक मतदान दिनांक 15 जानेवारी रोजी होणार आहे. त्याची मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी केज तहसील येथे होणार असुन त्याबाबतची प्रसिद्धी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी करण्यात येईल. सध्या होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील एकही गाव नसल्याने निवडणूक विभागावर फारसा ताण येणार नाही. या निवडणुकीसाठी एकूण 73 प्रभाग असून 185 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यात 104 एवढी महिला ऊमेद्वारांची संख्या असणार आहे. तर एकूण मतदार 31126 असून त्यात पुरुष 16291 तर 14835 महिला मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हि निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाकडून एकूण -34 वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली असुन त्यात एस टी बस - 6 मिनीबस -6 तर जीप- 22 अशी आखणी करण्यात आली आहे. तर या कामासाठी 346 कर्मचारी नेमण्यात आले असून क्षेत्रीय अधिकारी, मतदान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून -16 जणांची नियुक्ती करण्यात आली असुन लागेल तसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाचे नायब तहसीलदार मा.लक्ष्मण धस यांनी दिली आहे. काल शेवटच्या दिवशी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख असल्याने पुढील गावातील उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज बुधवारी धावपळीत सादर केले. त्यामध्ये निवडणूक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार घाटेवाडी - 26, गप्पेवाडी/नामेवाडी - 15 ,नारेवाडी - 19 ,मुंडेवाडी- 26 ,बोबडेवाडी - 12 ,सुकळी -15 ,दरडवाडी - 29 , भोपला -18 ,लाखा - 15, पाथरा -12 ,विडा - 68 , कोरडेवाडी -29 ,आंधळेवाडी -07 , येवता - 51 ,रामेश्वरवाडी/ ढाकणवाडी - 30 ,जाधवजवळा -23 ,मोटेगाव - 05, पैठण -37 , धोतरा - 21 , बानेगाव - 23 , वाघेबाभुळगाव - 75 , काशिदवाडी - 20 , शिंदी -11 असे एकुण -618 अर्ज दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी प्राप्त झाले आहेत.


COMMENTS