नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील कुंटुर परीसरात मौजे बळेगाव येथे गोविंदराव बेलकर यांना गुळ उद्योगातून मिळतात वर्षाला 40 लाख उत्पन्न,शेतकरी शेतात काहीच उत्पन्न मिळत नाही म्हणून अनेक शेतकरी शेती व्यवसाय सोडून शेतीपासून दूर होत चाललेला दिसत आहेत.मात्र माहितीपूर्ण शेती आधुनिक तंत्रज्ञान च्या मदतीने शेती केल्याने स्वताचा माल उत्पादन करून महाराष्ट्र गुजरात ,आंध्रप्रदेशात विक्री करुन शेती पूरक व्यवसायात भरपूर उत्पन्न मिळवता येते हे बळेगाव ता. नायगांव जि नांदेड येथील गोविंदराव बेलकर या उच्यशिक्षित शेतक-यांनी दाखून दिले .शेतीतून उत्पादिक केलेल्या गुळ गुजरात व महाराष्ट्र अंध्राप्रदेस येथील अनेक जिल्यात गुळाची विक्री केली जात आहे.
नायगांव तालुक्यात कुंटुर पासून ९ कि मी अंतरावर असलेले बळेगाव हे गोदावरी नदीच्या काठी आहे.बळेगाव येथे गोदावरी नदीवर उच्चपातळी बंधारा बाधून भरपुर पाण्याची शोय करण्यात आली आहे. यामुळे गावात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते आहे.याच गावातील शेतकरी गोविंदराव बेलकर यांनी शिक्षण घेऊन ३८ वर्ष सार्वजनिक बांधकाम इंजिनियर म्हणून नोकरी केली .मात्र त्यांना व्यवसाय करायचा होता .कुटुंबाची दहा एकर जमीन असल्याने त्यांनी नवीन शेती उद्योगांची माहिती घेऊन प्रशिक्षण घेतले या गुळ उद्योगाला सुरवात केली .सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड करून त्या उसाचे गुळ बनवण्याचे त्यांनी ठरवले .रसायन विरहीत विषमुक्त गुळाला जास्त मागणी असल्याचे त्यांना माहिती झाली .मग त्यांनी आपल्या शेतात श्री साई गुळ उध्योग या नावाने गुळाची कंपनी उभारली .त्यासाठी लागणारे साहिय त्यांनी गुजरात तेथून चरक मशीन, कढई ,साचे ,गुजरात मधुन विकत आणले. सदर गुळ उद्योगाला २००१ ला सुरवात केले अस्ल्याचे बेलकर यांनी सांगितले.उध्दोग सुरु करण्यासाठी त्यांना २ लाख रुपये खर्च आला असल्याचे सांगितले.उध्दोग सुरु झाला तेव्हा २ कलईया होत्या आता आज घडीला 8 कल या असून आज घडीला 3 तासात गुळ तयार होतो .एक कढई एक हजार लिटर पाक उकळले जाते.ऊसाचा रस होऊन सदर रस नळाद्वारे कढईत येऊन पडतात अशी शोय त्यांनी केली आहे.दोन हजार टन उसाचे गाळप करून २२५ टन गुळाची निर्मिती केलीजात आहे.सदर उसाचा रस काढल्या नंतर चीवटि चा वापर चुलीमध्ये पाक उकलण्यासाठी केलाजात आहे.सदर राख हि मळी चे कमपोष्ट खत केला जातो आहे.हा पुन्हा शेतीसाठी वापरला जात आहे .सदर प्रकल्प साठी एकूण १०० महिला पुरुष कामाला आसुन रोजगार मिळत आहे.या रोजगाराचा महिन्याकाठी साडेतीन लाख रुपये रोजंदारी द्यावी लागते.गुळ हा नैसर्गिक पद्धतीने बनविले जात असून याला महाराष्ट्रातील ३६ जिल्यासह गुजरात आंध्रप्रदेश येतील निझामाबाद ,कामारेद्दी ,सिकिंद्राबाद,या जिल्यात थेड विक्री केली जात आहे.या गुळ कामासाठी स्धानिक मजूर मिळत नसल्याने बिहार येधुन बेरोजगारांना कामाला आणावे लागत असल्याचे माहिती दिले.त्यामुळे .सदर गुळ पाॅकिंगसाठी 1 किलो ५ किलो १० किलो अश्या गुळाच्या ढेपी बनवल्या जात आहेत .सदर हा व्यवसाय ४ महिने चालतो चार महिन्यात चाळीस लाख रुपायचे उत्पन्न होते त्यातून मजुरी खर्च जाऊन चार महिन्यात दहा लाखाचे उत्पन्न हाती येत असल्याचे बेलकर यांनी सांगितले.


COMMENTS