राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )माहूर तालुक्यात लिंबायत,हडसणी,सेलु,हरडफ,सिंदखेड,अनमाळ,आष्टा,पापलवाडी,मेट व असोली या दहा गावच्या ग्रामपंचायतची निवडणुक येत्या 15 जानेवारी 2021 रोजी संपन्न होणार आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती दि.15 डिसें.रोजी निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी पत्रकारांना दिली.
या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची अधिसूचना दि.15 डिसें.रोजी निघाली असून नाम निर्देशनपत्र दाखल करण्याचे काम 23 ते 30 (25,26,27 व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून ) डिसें.पर्यंत चालणार असून 31 डिसें.ला छाननी होणार आहे.नामनिर्देशन पत्र वापस घेण्याची तारीख 4 जाने. ही असून त्याच दिवशी 3 वा. निवडणुक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे.प्रत्यक्ष मतदान 15 जाने.रोजी स.7-30 ते 5-30 या कालावधीत होणार असून मतमोजणी दि.18 जाने.रोजी स.10 वा.सुरू होणार आहे.
आपले नामनिर्देशन पत्र ऑन लाईन भरून त्याची प्रत काढून त्याला घोषणा पत्र जोड़णे ते नाम निर्देशन पत्र निवडणुक निर्णय अधिका-याकडे सादर करणे बंधनकारक आहे.रीतसर भरलेलेच नामनिर्देशन पत्र ग्राह्य मानण्यात येणार असून निवडणुक प्रक्रीया व लोकशाही मजबुत करण्यासाठी मतदारांनी भरघोस मतदान करावे असे आवाहन वरणगांवकर यांनी केले आहे.

COMMENTS