माहूर (प्रतिनिधी )दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत थाटात व भक्ती भावात साजरा होणारा दत्त जन्म सोहळा यावर्षी मात्र कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने व प.पु.प.म.मधुसुदनजी भारती महाराज व विश्वस्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेवून दत्त भक्तांनी घरीच राहून दत्त प्रभूची आराधना करावी असे आवाहन संस्थानच्या विश्वस्त समितीने प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकातून केले आहे.
दरवर्षी सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात भाग घेण्यासाठी राज्यासह तेलंगणा,कर्नाटक व संपूर्ण भारतातून लाखो भाविक दत्त दर्शना करीता येत असत.यावर्षी मात्र कोरोना विषाणुने घातलेल्या उपद्रवामुळे त्याची कुणालाही लागण होऊ नये ही खबरदारी घेवून विश्वस्त समितीने दि.29 डिसें.2020 रोजी संपन्न होणारा दत्त जन्म सोहळा पारंपारिक परंतु अगदी साधेपणाने व फक्त विश्वस्त आणि पुजारी यांचे उपस्थितीतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.तशा आशयाचे पत्रक सचिवाच्या स्वाक्षरीनिशी प्रसिद्धीसाठी दिले असून त्यात भाविकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून विश्वस्त समिती व शासनाला सहकार्य करण्या संदर्भात प.पु.प.म.मधुसुदनजी भारती महाराज यांनी केलेल्या आवाहनाचा उल्लेख सुध्दा करण्यात आला आहे.

COMMENTS