नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
शहरातील कुशिनारा बौध्द स्मशान भूमी येथे दरवर्षीप्रमाणे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञान सागराच्या प्रतिमेस विविध पदाधिकारी व बौद्ध उपासक यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर पंचशील ध्वजारोहण नगरसेवक देविदास बोमनाळे यांच्या हस्ते करण्यात आले व सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले असून या अभिवादन कार्यक्रमास भाऊराव पा.चव्हाण, गंगाधर पा.कल्याण, गजानन चव्हाण, धनराज शिरोळे, पीआय पडवळ, सय्यद एजाज, कैलास भालेराव, माधव पा.कल्याण,आयोजक राजेंद्र सोनकांबळे, दामोदर सोनकांबळे, राजू बेळगे, निवृत्ती हनुमंते, प्रकाश पोटफोडे, संभाजी पोटफोडे, संतोष भालेराव, सुभाष पवार, राहुल सोनकांबळे, शेषराव वाघमारे, गौतम सुर्यवंशी, चंद्रकांत तमलुरे, पिराजी सोनकांबळे, अतुल मंगरूळे, संजय भद्रे, गणपत बेंद्रिकर यासह बौध्दउपासक व शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

COMMENTS