सरस्वती महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा


केज प्रतिनिधी.

      महाविद्यालय ही आधुनिक काळात अद्यावत ज्ञानाचे केंद्र असली पाहिजेत. याच दृष्टीने नॅक मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे मत उपप्राचार्य प्रा. डॉ. संतोष उंदरे यांनी सांगितले. नॅकच्या दृष्टिकोनातून होत असलेली नवनवीन बदल आणि त्या दृष्टीने महाविद्यालयांना करण्याची तयारी या दृष्टीने सुधारित नॅक मूल्यांकन या विषयावर आयोजित सरस्वती महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

   कार्यक्रशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गौतम पाटील होते. यावेळी प्रा. डॉ. प्रमोद जावळे, प्रा. डॉ. एम साखरे, प्रा. अनिल चिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ. जावळे यांनी नॅक व त्यातील सात विभागांनुसार अत्यंत सविस्तरपणे असे मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. साखरे यांनी नॅक मूल्यांकनाची एकूण गुणदान पद्धत आणि त्या दृष्टीने करावयाची तयारी याविषयी सविस्तरपणे मांडणी केली. तर प्रा शिंदे यांनी अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे रिपोर्ट कसा तयार करायचा याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.

      कार्यशाळेस प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या