मुप्टाच्या वतीने 03 जाने. रोजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण


    बीड:-(दि.) महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टिचर्स असोसिएशनच्या (मुप्टा) वतीने देण्यात येणा·या सन 2020 च्या क्रांतीबा जोतीबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचा वितरण सोहळा रविवार दिनांक 03 जानेवारी 2021 रोजी मा. प्रा.प्रदिप रोडे  यांच्या अध्यक्षतेखाली तुलसी इंग्लिश स्कुल, बीड येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा. प्रा.डी.डी.गायकवाड (शिक्षण उपसंचालक,औरंगाबाद), मा. भगवान वीर ( उपायुक्त समाजकल्याण,नाशिक), मा. विक्रम सारुक (शिक्षणाधिकारी, (मा.) बीड), मा. प्रा. सुनिल मगरे (मुप्टा, संस्थापक सचिव), मा. डॉ. सचिन मडावी (सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, बीड) मा. संदिप उपरे ( अध्यक्ष, ओबीसी परिषद महाराष्ट्र राज्य), मा. प्रा. डॉ. संभाजी वाघमारे ( विभागीय अध्यक्ष, मुप्टा) मा. प्रा. अशोक बनसोड (अध्यक्ष मुप्टा मुंबई विभाग), मा. अॅड सुभाष राऊत ( सिनेट सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद), मा. अंकुश निर्मळ ( अध्यक्ष, धनगर समाज कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य.) मा. शिवाजी चाटे (सचिव, कै. यशवंतराव चाटे व तांत्रिक प्रशिक्षण संस्था तांबवा, ता.केज.) सह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    शिक्षक, प्राध्यापकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव लढाऊ  संघटना म्हणून मुप्टाने आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून संघटनेने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती निमित्त 125 प्रबोधनपर व्याख्याने घेण्यात आली.जगावरती कोव्हीड-19 च्या विषाणू महामारीमध्ये बीड मुप्टा संघटनेतर्फे गोर-गरीब, मजुर, गरजु परिवारांना 3 लाख 50 हजार रुपयांची  किराणा किट वाटप करण्यात आली. तसेच वडवणी तालुक्यातील खडकी देवळा जि.बीड येथील चि.सचिन बाबुराव कांबळे या युवकाची मेलबर्न विद्यापीठ आस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली असल्याने व त्याची  आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने बीड जिल्हा मुप्टाच्या वतीने 50 हजार रुपये मदत करण्यात आली व सामाजिक आरोग्य लक्षात घेवून मास्क, स्ॉनिटायझर वाटप करुन आरोग्य विषय जागृती करण्यात आली.

    प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून मुप्टाच्या वतीने सलग 12 व्या वर्षी साहित्य,सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा·या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे असे घोषित करण्यात आले होते.सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने या पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातुन एकूण 16  कृतिशील शिक्षकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय असुन मुप्टा शिक्षक संघटनेवर प्रेम करणा·या सर्व शिक्षक,प्राध्यापक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, सर्व सामाजिक संघटनेचे कर्मचारी / पदाधिकारी यांनी व मित्र परिवारांनी या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व हेच निमंत्रण समजून स्विकारावे व कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हा मुप्टा संघटना सर्व सदस्य व पदाधिकारी यांच्या द्वारे करण्यात आले आहे.



                                              

                              

                                            

                                    

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज