योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो ; महेबूब भाई आम्ही तुमच्या सोबत आहोत ! - शेख फेरोज


माजलगाव दि ३० (प्रतिनिधी )

कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ,सर्वसाधारण कुटुंबातूण येऊन ,शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर जर ,केवळ राजकीय हेतूने ,असे बिनबुडाचे आरोप होत असतील आणि त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचा डाव होत असेल , तर या पुढे चांगले आणि सर्वसाधरण कुटूबातील मुले राजकारणापासून अलिप्त झाल्या शिवाय राहणार नाही असे येथील सामाजिक युवा कार्यकर्ते शेख फेरोज यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे . 

    मा. शरदचंद्रजी पवारसाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी रात्रीचा दिवस करणार्‍या युवक महेबूब भाई संपुर्ण महाराष्ट्रातील युवक तुमच्यासोबत आहे 

भाई आपण आपल्या मेहनतीने ऊभे केलेल हे राजकीय स्थान काही लोकांच्या नजरेत नेहमी खटकत आहे. तुमचे काम खराब करता आले नाही तर ते तुमचे नाव खराब करण्याच्या मागे आहेत हे आम्हा युवकांना ठाऊक आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व पुढे यायला लागलं की त्याला मागे कसं खेचायचं ही विरोधकांचे षड्यंत्र आहे पोलिसांनी योग्य ती कारवाई करून या मागील कोण व सूत्रधार आहे तो शोधावा. 

आम्ही युवक आपल्या सोबत आहोत भाई काळजी करण्याची गरज नाही 

  असे बिन बुडाचे खोटे आरोप हाणून पाडू असे ही शेख फेरोज यांनी म्हटले आहे .

टिप्पण्या