दलितांची गायरान वरील अतिक्रमण हटवली, शासनाने गावठाण व गायरान वरील देवाचे मंदिर हटवावेत - राजेश घोडे यांची मागणी


माजलगाव/प्रतिनिधी

        दलितांची गायरान वरील असलेली अतिक्रमणे शासनाने हटविली पण गावठाण व गायरान वरील देवाचे मंदिर शासनाने हटवावेत अशी मागणी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांनी केली आहे. 

 महाराष्ट् राज्यातील दलित पिडीत शोषित समाज हा गेली अनेक वर्षांपासुन आपल्या टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी गायरान जमीनीमध्ये अतिक्रमण करून आपली व कुटूंबीयांची उपजिवीका भागवत संसाराचा गाडा चालवित आहे. ख-या अर्थाने गायरान धारक गायराण जमीन पिकवून देश सेवाच करत आहे. कारण गायरान धारकांच्या पिकामुळे राष्ट्ीय उत्पन्नात वाढच होणार आहे. दलितांच्या तोंडाला आलेला घास महसुल प्रशासनाने हिसकावला आहे. अतिक्रमण काढायचीच असतील तर गावठाणातील व गायराणातील देव देवतांची मंदिरे ही हटवा अशी मागणी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांनी केलली आहे. महसुलचे उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांचे कार्यालयासमोर गायरान धारकांचे उपोषण चालु आहे. या उपोषणाला राजेश घोडे, महादेव उमाप, बाबासाहेब मुजमुले यांनी भेट दिली.

टिप्पण्या