मुंबई | मार्चपासून महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्ग रोगाचा फैलाव सगळीकडे पसरला होता. या काळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड आजारा...
मुंबई | मार्चपासून महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्ग रोगाचा फैलाव सगळीकडे पसरला होता. या काळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड आजारावरील उपचारासाठी केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
कोरोना काळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांना कोविडची लागण झाली. त्याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च आला. काहींना स्वतःचे प्राणसुद्धा गमवावे लागले. याबाबत शिक्षक संघटनांनी वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या यादीत कोविड-19 चा समावेश करण्याबाबत मागणी केली होती.

COMMENTS