केज दि १०(प्रतिनिधी)
आज जनविकास महाविद्यालयांमध्ये जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त राज्यशास्त्र विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांच्या
हस्ते "मतदार" या भित्तिपत्रकाचे विमोचन करण्यात आले. या वेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. राजेश गायकवाड, भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. हरिदास पिसाळ, प्रा.डॉ. मुरलीधर लहाडे, प्रा. डॉ सतीश कदम, प्रा. डॉ गीतांजली मोटे, प्रा. डॉ. मोहन कांबळे, प्रा. प्रा. डॉ. केशव तिडके, प्रा. डाँ. संतोष कणसे, प्रा. जयंत मोरे , प्रा. डॉ. नंदकिशोर चिताडे, प्रा. बाळासाहेब गोरे, प्रा. उमाकांत गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे सर यांनी जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राजेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रा.डॉ गीतांजली मोटे यांनी आभार मानले.

COMMENTS