![]() |
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुकयातील मौजे आंबुलगा (बु ) येथील शांती निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकरराव मामीलवाड यांचा मुलगा सुमीत सुधाकर मामीलवाड ह्याने २०२० मध्ये पार पडलेल्या जेईई परीक्षेमध्ये विशेष प्राविन्यासह गुण मिळवून मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी अलहाबाद, प्रयागराज उत्तरप्रदेश येथे (एन.आय.टि.) प्रवेशासाठी पात्र ठरलेला आहे . मौजे आंबुलगा (बु ) येथील सुमीत सुधाकर मामीलवाड या विद्यार्थ्याने लॉक डाऊनच्या कालखंडामध्ये अतिशय खडतर मेहनत व जिद्दीच्या जोरावर स्वयं अध्ययनातून हे यश प्राप्त केले आहे . सुमीत हा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रामराव रामोड यांचा नातू , तर महाराष्ट्र विद्युत वितरण विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता इरन्ना विठ्ठलराव मामिलवाड यांचा पुतण्या आहे. त्याच्या या यशाबद्दल सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

COMMENTS