धर्माबाद :- शेतकर्यांच्या विरोधातील कृषी कायदा रद्द करण्यासाठी दिल्ली येथे ठाण मांडुन बसलेल्या पंजाब व हरियाणा राज्यातील शेतकर्यांच्या सन्मानार्थ व शेतकरी विरोधी कायदा त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर घटक पक्षातर्फे आज धर्माबाद कडकडीत बंद करण्यात आले.
सदरील बंद मध्ये महा विकास आघाडी बरोबर मराठा सेवा संघ,वंचित बहुजन आघाडी, छावा संघटना,हमाल मापाडी,मराठवाडा पायोनियर डिस्टलिरी कामगार संघटना यांचाही समावेश होता. सकाळी शहरातील पानसरे चौकातून घोषणा देत मिरवणूक काढुन बंदला सुरवात करण्यात आली.
सदरील बंद मध्ये कॉग्रेस चे तालुकाध्यक्ष दत्ताहरी पाटील चोळाखेकर, शिवसेना तालुका संघटक गणेश गिरी, मार्केट संचालक गोविंद पाटील रोषणगांवकर, नागोराव पाटील रोषणगांवकर,शहराध्यक्ष ताहेर पठाण,शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतिनिधी आकाश रेड्डी,नगरसेवक निलेश पाटील,माजी नगराध्यक्ष दिगांबर लखमावाड, राष्ट्रवादीचे रवि शेट्टी, नगरसेवक प्रतिनिधी सुधाकर जाधव, शिवसेना शहर प्रमुख अनिल कमलाकर, माजी शहर प्रमुख राजु शिरामने,मराठा सेवा संघाचे संतोष ठाकरे, छोटु पाटील बाभळीकर,वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष भगवान कांबळे, नगरसेवक प्रतिनिधी राजु सुरकुटवार, युवक काँग्रेसचे हानमंत नरवाडे, युवक काँग्रेस नायगाव विधानसभा अध्यक्ष बालाजी पाटील,बंडु पाटील बाभळीकर,मोहम्मद जावेद सर, नरेंद्र रेड्डी, विठ्ठल कोडंलवाडे, साईनाथ पाटील मोकलीकर,हानमंत किरोळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हानमंत जगदंबे, पंडित पाटील, नगरसेवक प्रतिनिधी शम्मुभाई, सुर्यकांत पाटील जुन्नीकर,मारोती माकणे,अल्पसंख्याक कॉग्रेस युवक शहराध्यक्ष शेख माजीद,आकाश ढगे, हमाल संचालक गौस भाई, बळीराम पाटील पवार,युवासेनेचे सतिश माळगे,पायोनियर कामगार संघटनेचे पवार वाय.बी , सादीक करखेलीकर,सय्यद बाबर, ईत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी ,शेतमजूर उपस्थित होते.
COMMENTS