राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.कोरोनाच्या संकट काळामध्ये राज्यभर ऑनलाईन शिक्षणाचे कार्य सुरू आहे.याकाळात अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा भावनिक विकास व्हावा, तणावमुक्त शिक्षण व्हावे.यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने 'लोकरंग' या राज्यस्तरीय ऑनलाईन गीत-गायन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ.सुचिता पाटेकर यांनी दिली.
ही स्पर्धा ऑनलाईन असल्याने दिनांक १५ डिसेंबर पर्यंत गीत गायनाची चित्रफित (व्हिडिओ) गुगल ड्राईव्ह वर अपलोड करून त्याची लिंक patekarsuchita8@gmail.com यामेल वर पाठवावी.या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रूपये ३००१ व सन्मानपत्र,द्वितीय पारितोषिक रूपये २००१ व सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक रूपये १००१ व सन्मानपत्र.तसेच ५०१ रूपयांचे उत्तेजनार्थ तीन पारितोषिके व सन्मानपत्र जिल्हा परिषद अध्यक्षा मा.निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांच्या वतीने दिली जाणार आहेत,अशी माहिती स्पर्धा समन्वयक डि.के.पवार यांनी दिली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तंत्रज्ञ ज्ञानदेव ननुरे,दत्ता अम्रित,दशरथ मुंडे,विनायक पौळ,अनिल स्वामी आदी सहकार्य करत आहेत.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ,स्पर्धा समन्वयक 7620032314
COMMENTS