जिल्हा प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
मागील विस वर्षापासून विविध गुन्हे दाखल असलेला कोर्ट फरार आरोपी परभणी येथे आपले नाव, गाव, पत्ता वेषभूषा बदलुन वावरत होता ज्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे कर्तबगार प्रभारी पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने सदर आरोपीस अटक केली आहे.
हिंगोली शहरातील पेन्शनपुरा येथील निवासी सय्यद बशीर सय्यद ईस्माईल हा परभणी येथे मंगेशनगर परिसरात वेशभुषा बदलुन राहत होता. 20 वर्षापुर्वी त्याच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.तसेच न्यायालयाने 2013 रोजी कोर्ट फरारी आरोपी घोषीत केले होते..स्थानिक गुन्हे शाखेत नव्याने रूजु झालेले कर्तबगार प्रभारी पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी 20 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणार्या आरोपीस अटक केली आहे.अटक करतांना आरोपीने तो मी नव्हेच म्हणून उडवा उडवीची उत्तरे देत होता यावेळी पोलिसांनी खाक्या दाखवताच तो मीच असल्याची कबुली त्याने पोलीसांसमोर दिली. सदर कारवाई पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, उपनिरीक्षक किशोर पोटे, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, बालाजी बोके, संभाजी लेकुळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर,अशिष उंबरकर, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, शंकर ठोंबरे, किशोर सावंत यांच्या पथकाने केली

COMMENTS