एक ध्येयवेडा प्राथमिक शिक्षक ते गटशिक्षणाधिकारी प्रवास



एक ध्येयवेडा प्राथमिक शिक्षक ते गटशिक्षणाधिकारी प्रवास हदगाव पासून काही अंतरावर असलेल्या श्री दत्त बरडी च्या पायथ्याशी असलेल्या वाटेगाव येथील कै ,यादवराव पा जाधव स्वातंत्र्य सैनिक यांचा एकुलता एक मुलगा श्री प्रकाश जाधव प्राथमिक शिक्षक म्हणून रूजू झाले ,धिप्पाड, उंच व्यक्तिमत्त्व, बुलंद आवाज, अशी त्यांची ओळख, प्रारंभी त्यांनी आपली सेवा ग्रामीण भागात केली ,माझा त्यांचा जवळून आणि एक सहकारी मित्र म्हणून सहवास लाभला ,जो वर्ग दिला तो आवडीने शिकवायचे अगदी लहान होऊन विद्यार्थ्यांत रममाण व्हायचे, त्यांत त्यांचा पहाडी आवाज ,पण सुरेल आवाज होता ,हिंदी विषयाचे अध्यापन आवडीने करायचे ,आमच्या वेळेस दर महिन्याला शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत होती ,त्या बैठकीत आदर्श पाठ घ्यावा लागत असे, अगदी काटेकोरपणे टाचण काढल्या जात होते, तेही तपासल्या जायचे हे सर्व शिक्षकाचे नजरेखालून जात होते ,त्या पाठा वर सांगोपांग चर्चा व्हायची त्यात प्रकाशराव पुढे असायचे, नंतर1995 पासून गटसंमेलन सुरू झाले , असाच एक अनुभव आम्ही दोघे बस ने 1992 ला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी गेलो ,पण चालताना इतके वेगात चालायचे मला पळाव लागायचे, त्यांच्याबरोबर प्रवासात एकमेकांना साथ कशी करायची ते मला कळलं, पुन्हा साक्षरता अभियान सुरू झाले ,सरांच्या नेतृत्वाखाली कला जथा स्थापन केला आणि दररोज सायंकाळी एका खेडेगावात जाण्याचं नियोजन शिक्षण विभागाने ठरवून दिले होते, सर्व धुरा मात्र प्रकाशराव जाधव सरांनी सक्षमतेने सांभाळचे ,साहित्याची जमवाजमव करणे ,ने आण करणे त्या वेळी वाहनांची फारशी व्यव स्था नव्हती, त्यातही एखादं साहित्य कमी असल्यास जाधव सर स्वतः होउन त्याचं वेळेस पैदल जायचे ,सरांना राग कधी आलेला पाहिला नाही ,त्याच काळापासून माझ्या संचलनला सुरुवात झाली ,कला जथा यामध्ये माझ्या कडे संचलन असायचे ,इतर सहकारी शिक्षक मित्र सागर शिंदे, गणेश सावंत, सौ मालती पोटेकर, अक्कावार सर काही विद्यार्थी सुद्धा सहभागी होते , आमचा कलामंचानी संपुर्ण जिल्ह्यात जनजागृती केली, सरांचा अध्यात्मिक कडे सुरुवातीपासून खूप ओढा होता तो आजही कायम आहे ,भजन ,नाटकात सुद्धा उत्कृष्ट भूमिका केल्या आहेत, अतिशय जिद्दी, व्यवहारी, कर्तव्यदक्ष, म्हणून सरांची ओळख आहे, आज ते हरी भजनी पंडित म्हणून ग्रामीण भागात उत्कृष्ट कीर्तन करतात ,पुढे ते मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ,शिक्षण विस्तार अधिकारी झाले आज ते निहत वयोमानानुसार गटशिक्षणाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत ,त्यांनी या शिक्षण क्षेत्रात अमूल्य सेवा बजावली ,त्यांचे पुढील आयुष्य हे पूर्णपणे अध्यात्मिक क्षेत्रात नक्कीच घालवणार ,त्यांना दीर्घायुष्य लाभो ,हीच सदिच्छा आपलाच मित्र श्री आर यु कऱ्हा ळे भानेगावकर



टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज