*लोकशाही विघातक ईडी क्षपणास्त्राचे मास्टर माईंड मोदी शहा फडणवीस, स्वातीताई मोराळे.*


बीड प्रतिनिधी

 सत्तेचा व कायद्याचा दुरुपयोग करून विरोधी पक्षातील लोकांना संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आज केला जात आहे. ईडी, इनकम टॅक्स यासारख्या कायद्याचा वापर सत्ता आणण्यासाठी व ती टिकवून ठेवण्यासाठी केला जात आहे. याचे मास्टरमाईंड पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा व माजी मुख्यमंत्री फडणवीस आहेत.विरोधी पक्ष संपुष्टात आणण्यासाठी याचा सर्रास वापर केला जात आहे. यामुळे विरोधी पक्ष खिळखिळा होऊन लोकशाही दुबळी करणे व हुकूमशाहीला बळ देऊन सत्ता मिळवणे व टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

       मा. एकनाथराव खडसे जोपर्यंत भाजपात होते तोपर्यंत त्यांना to क्लीन चीट देणारा भाजपा त्यांनी विरोधी पक्षात प्रवेश करताच त्यांच्यावर ईडीची चौकशी लावणे, शिवसेना जो पर्यंत मित्रपक्ष होती तोपर्यंत चांगली आणि बाहेर पडली की त्यांच्या नेत्यांवर त्यांच्या कुटूंबावर ईडीच्या चौकशीचा शिसेमारा लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हे मास्टर माईंड करत आहेत. आम्ही लोकशाहीचे रखवालदार म्हणणारे लोकशाहीचा कणा विरोधी पक्ष नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

     राज्यपाल यांना भाज्यपाल करून टाकले आहे. विधान परिषद वर शिफारस केलेल्या लोकांची नियुक्तीही करायची नाही आणि त्यांना नकारायचे ही नाही त्यामुळे या नियुक्तीला जो विलंब होत आहे हेही लोकशाहीला विघातक आहे. जे त्या कॅटेगिरीमध्ये बसत नाहीत त्यांना नाकारून बाकीच्या निकयुक्त्या करणे व बाकीच्या रिक्त जगासाठी योग्य सूचना देणे राज्यपाल महोदयाने करणे अपेक्षित आहे.

      शेतकरी विरोधी व अंबानी अदानी पोषक कायदे करून हे मास्टर माईंड कोणाची रखवालदारी करत आहेत.BSNL चे Jio करण करून त्यांना काय साध्य करायचे आहे. आणि याबद्दल कोणी बोलले तर ते देशद्रोही बनवत असतील तर मास्टर माईंड यांचे पाय चाटणे म्हणजे देशप्रेम होय काय?

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज