*महिला, तरुणी, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी लवकरात लवकर ''शक्ती कायद्यास" तात्काळ चालना देण्याची गरज... ना.डॉ.नीलम गोऱ्हे*


पुणे/मुंबई दि.३० : पेण येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या तसेच विविध ॲप, सोशल मीडियाच्या तसेच वेबसाईटद्वारे संपर्कात येवून वाकड येथे तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार, याचबरोबर सिडको पोलिस ठाणे, संभाजीनगर येथे दाखल घटनेत नौकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचाराची घटना अशा घटनांबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देऊन यातील आरोपींना अटक करून कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे. (सदरील घटना दि.२७ ते २९ डिसेंबर, २०२० दरम्यान घडलेल्या आहेत

★ पण, रायगड येथील बलात्काराच्या आरोपाखाली तूरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने एका ३ वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे. सदरील घटना काल दि.२९ डिसेंबर, २०२० रोजी समोर आली असून यातील आरोपी अद्याप फरार आहे. आरोपीला त्वरित अटक करण्यात यावे असे निर्देश स्थानिक पोलिसांना ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिले आहेत.

★ वाकड पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड, पुणे अंतर्गत टिंडर ॲपच्याद्वारे ओळख करुन घेवून तरुणीवर अत्याचार केल्याचे दुदैवी घटना नुकतीच निदर्शनास आली आहे. याबाबत वाकड पोलीस स्टेशन येथे एफआयआर क्र.०९१२/२०२० नुसार गुन्हा नोंद झाला आहे. यात तरुणीला तिच्या इच्छेच्या विरोधात दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचे तरुणीने एफआयआर मध्ये नमूद केले आहे. सदरील घटनेत आरोपीला अटक करण्यात आली असलेतरी देखील आरोपीच्या कुटुंबाकडून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याबाबत बोलून आरोपीला या घटनेतून सूट मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे काही सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी यात आरोपीला जामीन मिळणार नाही याची पूर्ण काळजी घेण्याचे निर्देश ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिलेल्या पत्राच्या माध्यमातून पोलीस विभागास दिले आहेत.

★ संभाजीनगर येथे एका पक्षाच्या कार्यकर्त्याने नौकरीचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. यात आरोप हा ''मी तो नव्हेच " असे म्हणत असून पीडित मुलीवर आणि कुटुंबावर दबाव आणत आहे. यामुळे पूर्वीच्या केसेस प्रमाणे या कसे मध्ये देखील पोलिसांकडून बी समरी रिपोर्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेचा तपास वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात यावा. तसेच संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महिलांवरील अत्याचाराच्या बऱ्याच केसेस मध्ये बी समरी रिपोर्ट करून त्या केसेस बंद करण्यात आल्या आहेत. ज्या केसेस मध्ये बी समरी रिपोर्ट करून बंद केल्या आहेत या केसेस चा आढावा गृहराज्यमंत्री ग्रामीण श्री शंभूराजे देसाई यांनी घेण्याच्या सूचना देण्यात यावी अशी मागणी ना.डॉ.गोऱ्हे यांनी सदरील पत्रात केली आहे.

 तसेच, यापूर्वीही नवी मुबई पोलीस आयुक्त्तालयाअंतर्गत मॅट्रीमोनीअल वेबसाईटचा वापर करुन अनेक तरुणीची शारिरीक व आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल आहे. *राज्यात यास्वरुपाच्या घडत असलेल्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने सुधारणा करणे आवश्यक वाटत असल्याचे ना.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले असून यात...*

● पेण, रायगड येथील अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या घटनेत आरोपी पॅरोलवर होता हे निष्पन्न झाले आहे.

* *बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला पॅरोलवर सोडण्यात येऊ नये अशी विनंती मा.न्यायालयास गृहविभागाकडून करण्याची डॉ.गोऱ्हे यांनी सूचना केली आहे.

● महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या 'शक्ती कायद्यात' सायबर गुन्ह्यात देखील आरोपीला कडक कारवाई होण्याबाबत तरतूद केली गेली असली तरी देखील शक्ती कायदा लवकरात लवकर आस्तित्वात येण्यासाठी गृहविभागाकडून तात्काळ कार्यवाही अपेक्षित आहे. काही सामाजिक संस्थांना शक्ती कायद्यात काही उपयोजना सुचव्याचा आहेत. याबाबत सूचना मागविण्यासाठी स्वतंत्र ई-मेल घडण्याची आपणास सूचना करत असून कायद्याबाबत गठीत विधिमंडळाची बैठक लवकर घेण्याची सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी या माध्यमातून केली आहे.

● सर्व सोशल वेबसाईट वर लॉगीन करणाऱ्या सर्व व्यक्तीचे KYC च्या धर्तीवर त्याचे खात्याशी आधारकार्ड क्रमांक संलग्न करणे बंधनकारक करावे, जेणेरुन गैरप्रकार /सायबर गुन्हे/अत्याचार करणाऱ्या आरोपीची सर्व माहिती तात्काळ उपलब्ध होईल.

● सध्या (कोविड-१९) या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी मोठयाप्रमाणावर ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. किशोर वयापासून ऑनलाईन ॲप्‍लीकेशन वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑनलाईन माध्यमाचा वापर करुन होणाऱ्या गुन्हयांची/ गैरवापराची संख्याही वाढत आहे. यासाठी सायबर क्राईममधील तज्ञ व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ यांच्या समन्वयाने, विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन ॲप्लीकेशन वापर करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी ? कोणती माहिती/ फोटो शेअर करुन नये, याबाबतच्या शैक्षणीक घटकांचा शालेय अभ्यासक्रमांत अंतर्भाव करण्याबाबतही कार्यवाही करणे योग्य होईल. उपरोक्त नुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना निर्देश व्हावेत अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी गृहमंत्री ना.देशमुख यांनी केली आहे.

औरंगाबादच्या घटनेमध्ये जे आम्ही म्हणतोय व सरकारकडे मागणी करतोय तीचं मागणी विधानपरिषदेच्या सन्माननीय उपसभापती निलमताईंनी केलीये 

पिडीतेला नोकरीचं आमिष दाखवून अत्याचार केला आणि आता “तो मी नव्हेचं” म्हणत पिडीता व तिच्या परीवारावर दबाव आणत आहे

एव्हढचं नाही तर पोलिसांकडून या प्रकरणात बी समरी रिपोर्ट होण्याची शक्यता नाकारतां येत नाही ही शक्यता ही मा.निलमताईंनी त्यात वर्तवली आहे

आता तरी शासन नियमानुसार कारवाई करणार कि अजुनही आरोपीला पाठीशी घालणार.


चित्रा किशोर वाघ*

भाजप,प्रदेश उपाध्यक्ष

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज