सोलापूर :
कोरोनामुळे पहिली ते आठवीच्या वर्गातील दीड कोटी मुलांच्या शालेय चाचण्या यंदा झाल्या नाहीत. स्वाध्याय संचद्वारे त्यांची घरबसल्या परीक्षा घेतली. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा बौध्दिक स्तर कमी झाल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा स्तर पडताळून उपचारात्मक अध्यापनावर भर दिला जाणार आहेशाळा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु करण्याचे नियोजन
पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात की 26 जानेवारीला सुरु करायच्या, याचे नियोजन सुरु आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडे त्यासंबंधीचा अभिप्राय मागविला आहे. त्यांच्या अभिप्रायानुसार नियोजन होईल. ऑनलाइन, ऑफलाइन, स्वाध्याय संच, गृहभेटीद्वारे शिक्षण दिले जात आहे. परंतु, राज्यातील प्रत्येक भागातील परिस्थिती वेगळी असल्याने शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा बौध्दिक स्तर पाहून उपचारात्मक अध्यापनावर भर दिला जाईल.
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री
COMMENTS