केज तालुका क्रिकेट फेस्टवेल स्पर्धा संपन्न ( के सहारा विजेता उपविजेता संघ मीम सरकार )


(केजकरांनी संधी दिल्यास पुढील वर्षीचे सामने हक्काच्या क्रीडांगणात होतील ----हारूनभाई इनामदार)

केज दि २९(प्रतिनिधी)

केज शहरात केज तालुका क्रिकेट फेस्टवेल चा समारोप मंगळवारी झाला अंतिम सामना के सहारा व मीम संघात झाला. के सहारा संघाने विजय मिळवला.तर मीम संघ उपविजेता ठरला.

यावेळी विजेता संघ के सहारा ला 51 हजार रुपये सन्मान चिन्ह (कप)देऊन देऊन गौरव करण्यात आला. कर्णधार भाऊसाहेब पाटील,कर्णधार विजय साळवे यांच्या संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.उपविजेता मीम सरकार संघास 25 हजार रुपये व सन्मान चिन्ह बक्षीस देण्यात आले.तृतीय संघ हाबाडा संघास प्रोत्साहनपर बक्षीस सन्मान चिन्ह देण्यात आले

बक्षीस वितरण सोहळ्यास 

केज नगरपंचायत चे गटनेते हारूनभाई इनामदार,जहिरोद्दीन हाफिज,बशीरभाई इनामदार, फारूक कादरी, आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलतांना

केजकरांनी संधी दिल्यास पुढील वर्षीचे सामने हक्काच्या क्रीडांगणात होतील असे मत गटनेते हारूनभाई इनामदार यांनी मत व्यक्त केले व संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

उपांत्य फेरी चा सामना हाबाडा वारीअर्स मीम सरकार या संघात झाला .यामधून विजेता संघ मिम सरकार आणि आणि के सहारा संघ यांमध्ये झाला.

जहिरोद्दीन हाफीज साहब यांच्या आयोजनातून मागील तीन वर्षांपासून स्पर्धा सुरू आहेत यावर्षी कोविड संकटामुळे काळजी घेऊन सामने झाले.प्रथम पारितोषिक हारूनभाई इनामदार यांच्याकडून एकावन्न हजार, अजर भैय्या इनामदार व सय्यद साजेद यांच्याकडून देण्यात आले

द्वितीय पंचवीस हजार देण्यात आले.

तृतीय पारितोषिक जिशान कादरी यांच्याकडून सन्मान चिन्ह देण्यात आले.यावेळी 

अंतिम सामन्यास सोन्याबापू भोसले

 स्नेहल केंद्रे(पीप) यांनी पंच म्हणून काम पाहिले.

त्कृष्ट संचलन मिनाजभाई पठाण यांनी केले.

टिप्पण्या