केज प्रतिनिधी:- ईपॉज मशीनवर बोटांचे ठसे घेऊनही स्वस्त धान्य दुकानदार जीवनावश्यक वस्तू देत नसल्याच्या तक्रारीवरुन तहसिलदारांनी मंडळ अधिकारी ...
![]() |
केज प्रतिनिधी:- ईपॉज मशीनवर बोटांचे ठसे घेऊनही स्वस्त धान्य दुकानदार जीवनावश्यक वस्तू देत नसल्याच्या तक्रारीवरुन तहसिलदारांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना दुकानाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, कोरेगाव येथील लक्ष्मण रामा शिनगारे रेशन दुकानदार हे ग्राहकांचे स्वस्त धान्य दुकानातील कार्डधारकांची बोटांचे ठसे मशीनवर घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू देत नाहीत किंवा त्या बाबतची छापील पावतीही देत नसल्याची तक्रार तहसिलदाराकडे केली होती. याची दखल घेऊन तहसीलदारांनी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना यासंबंधी तक्रारीच्या अनुषंगाने रेशन दुकानदार यांची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत

COMMENTS